साखरखेर्डा (बुलडाणा): वडगाव माळी येथे विहिरीची दरळ कोसळून मजूर ठार झाल्याची घटना १ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. वडगावमाळी येथील सुनील बद्री अवचार यांच्या विहिरीचे खोदकाम चालू असून, विहिरीवर सायाळा येथील भगवान किसन आव्हाळे यांच्यासह चार मजूर काम करीत होते. विहिरीचे खोदकाम सुरु असताना काही दगड अचानक विहिरीत कोसळले. त्यातील एक मोठा दगड भगवान आव्हाळे यांच्या डोक्यावर पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलीस पाटील अमोल आत्माराम अवचार यांच्या फिर्यादीवरुन ठाणेदार नीलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे. दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्यामुळे ग्रामीण परिसरातील अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचा घटना घडल्या आहेत. आगीत चार जनावरांचा मृत्यू
विहिरीची दरड कोसळून एक ठार
By admin | Updated: March 2, 2016 02:25 IST