शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

देऊळघाटजवळ सापडले बेपत्ता युवकांचे मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 02:55 IST

नदीच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या दोन युवकांचे मृतदेह देऊळघाटजवळ सापडले.

बुलडाणा, दि. 0२- तालुक्यातील पळसखेड परिसरात पैनगंगा नदीवर बंधार्‍यात पोहण्यासाठी गेलेले दोन युवक नदीच्या प्रवाहात बेपत्ता झाल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. दरम्यान, बेपत्ता दोन्ही युवकांचे मृतदेह देऊळघाटजवळ नदीच्या पात्रात आढळून आल्यामुळे शोधकार्याला पूर्णविराम मिळाला आहे.बुलडाणा शहरात हमालीचे काम करणारे जमील खान दुलेखान (वय ३८), ताज खान (वय ३0) दोन्ही रा. इंदिरा नगर तसेच सूर्या खरे (वय ३५) रा. जुने आरटीओ कार्यालय मागे हे तिघे शनिवारी सकाळी एका ऑटोद्वारे बुलडाणा-अजिंठा मार्गावरील पळसखेड नागो शिवारातील पैनगंगा नदीवर पोहचले. या ठिकाणी नदीत बांधलेल्या एका बंधार्‍यावर पोहण्यासाठी प्रथम सूर्या खरे यांनी उडी मारली; परंतु शुक्रवारी आलेल्या दमदार पावसामुळे पाण्याच्या वाढत्या प्रवाहात सूर्या खरे वाहू लागला. त्याला वाचविण्यासाठी जमील खान याने नदीत उडी मारली; मात्र दोघेही पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहू लागले. या घटनेची माहिती त्यांचा तिसरा मित्र ताज खान यांनी बुलडाण्यातील नातेवाइकांना दिली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठय़ा संख्येने देऊळघाट, दत्तपूर येथील युवक त्यांना शोधण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले; मात्र ते दोघेही मिळून आले नाही. यावेळी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके, तहसीलदार दीपक बाजड, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कंकाळे आपल्या पथकासह दाखल झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता दोघांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, रविवारी सकाळी ७ वाजेदरम्यान देऊळघाटच्या पैनगंगा नदीवरील पुलाजवळ एक मृतदेह आढळला. यावेळी परिसरातील नागरिकांनी सदर मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो सूर्या खरे याचा असल्याचे दिसून आले. यावेळी थोड्या अंतरावर दुसरा जमील खान याचा मृतदेह झुडुपात अडकलेला आढळून आला. यावेळी तहसीलदार दीपक बाजड, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कंकाळ यांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.