शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

डाटा ऑपरेटर्सना संप भोवला

By admin | Updated: December 13, 2014 00:20 IST

व्हीएलई करार रद्द : ऑपरेटर्सना कामावरुन काढले

दगडू तायडे / जनुना (बुलडाणा)तालुक्यातील गावागावातील ग्रामपंचायतच्या कामात सुसूत्रता यावी, नागरिकांची कामे सुलभ व त्वरित व्हावी, यासाठी ९६ ग्रा.पं.मध्ये ८८ ग्रामपंचायत डाटा ऑपरेटरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या; मात्र तब्बल ऑगस्ट ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत ग्रा.पं.चे डाटा ऑपरेटर संपावर राहिले. परिणामी याचा ग्रा.पं. कामावर मोठा परिणाम झाल्याने जिल्हा परिषदेच्या जिल्हा समन्वयकांनी सदर व्हीएलई करार रद्द केला. त्यामुळे डाटा ऑपरेटरांना हा संप भोवला असून, त्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे.जन्म प्रमाणपत्र, नमुना ८ यासह कितीतरी सुविधा ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन झाल्या आहेत. या सुविधेमुळे नागरिकांची कामेही सुलभ व त्वरित होत आहेत; मात्र तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर संपावर असल्याने ही सेवा खोळंबली होती.या कालावधीत ग्रा.पं. स्तरावरील संग्राम प्रकल्प अंतर्गत असलेले कोण तेही कामकाज ग्रा.पं. डाटा ऑपरेटरांनी पूर्ण केले नाही; तसेच मागील तीन महिन्याच्या कालावधीत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही. संग्राम प्रकल्पांतर्गत संगणक परिचालकाचे कंत्राट रद्द करण्याचे सर्व अधिकार कंपनी प्रशासनाने आपल्याकडे राखून ठेवले होते. परिणामी डाटा ऑ परेटर संघटनेने संपामध्ये मोठय़ा प्रमाणावर नियमांचे उल्लंघन केले होते. यामुळे जिल्हा समन्वयाकडे मोठय़ा प्रमाणावर तक्रारी वाढल्याने त्यांनी व्हीएलई सेवा करार रद्द केला.