सिंदखेडराजा (बुलडाणा) : स्थानिक पुतळा बारव परिसरातील एका घरात चार अज्ञात दरोडेखोरांनी घुसून वृद्धास मारहाण करून आणि महिलांना चाकूचा धाक दाखवून ६0 हजारांचे दागिने पळविल्याची घटना रविवार २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. फिर्यादी पुष्पा मनोहर मेहेत्रे यांच्या घरात चार अज्ञात दरोडेखोरांनी रात्रीदरम्यान प्रवेश केला. घरात अचानक चोर घुसल्याने घरातील मंडळींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दरम्यान, दरोडेखोरांनी प्रल्हाद खांडेभराड यांना मारहाण करून एका घरात कोंडले. तर घरातील इतर महिलांना दुसर्या घरात कोंडून चाकूचा धाक दाखविण्यात आला व त्यांच्याकडून गळ्यात असलेली २00 मन्याची सोन्याची एक पोथ व कानातील कर्णफुले काढून घेतले आणि चारही दरोडेखोरांनी ६0 हजार रु पयांचे सोन्याचे दागिने घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चाकूचा धाक दाखवून ६0 हजारांचे दागिने पळविले
By admin | Updated: September 29, 2014 23:56 IST