शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी शोधल्या डेंग्यूच्या अळ्या!

By admin | Updated: August 13, 2016 01:03 IST

परिसर डेंग्यूमुक्त करण्याचा विद्यार्थ्यांनी केला निर्धार.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. १२ : सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले, डबके साचल्याने मोठय़ा प्रमाणात डासांची निर्मिती होऊन अनेक व्यक्ती तापाने फणफणत आहेत. त्यामुळे परिसर डेंग्यूमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करून शालेय विद्यार्थ्यांनी घर तसेच गाव परिसरात डेंग्यू अळींचा शोध घेऊन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात यावर्षी संततधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती झाली. त्यामुळे ग्रामीण भागासह शहर परिसरात तापाचे रुग्ण वाढले असून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागीलवर्षी डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढली होती. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे नियोजन केले होते. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीयाशीलतेचा उपयोग करून घेण्यासाठी १ ते १५ ऑगस्ट दरम्यान हा पंधरवडा शालेय डेंग्यू जागृती मोहीम म्हणून संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून १२ ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांनी डेंग्यू अळ्या शोध मोहीम आपल्या गाव परिसरात राबविली. यावेळी डेंग्यू डासाची उत्पत्ती होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी पालकांसह परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन केले.