शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:45 IST

बुलडाणा: यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे  जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा आहे.  त्यात नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ होणार  असून, टंचाईग्रस्त १४0 गावातील पाणीटंचाई दूर  करण्यासाठी ९७ हातपंपांचा आधार घ्यावा लागणार  आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा १४0 गावे पाणीटंचाईग्रस्त गावांना ९७ हातपंपांचा  आधार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे  जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा आहे.  त्यात नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ होणार  असून, टंचाईग्रस्त १४0 गावातील पाणीटंचाई दूर  करण्यासाठी ९७ हातपंपांचा आधार घ्यावा लागणार  आहे.जिल्ह्यात ७१२.७ मि.मी. सरासरी पर्जन्यमान अस ताना यावर्षी आजपर्यंत ४९५.६ मि.मी. म्हणजे  सरासरीच्या ६९.९३ टक्के पाऊस झाला आहे. सदर  पाऊस अल्प असून, जिल्ह्यातील विविध प्रकल्पात  अल्प जलसाठा आला आहे.  संभाव्य टंचाईग्रस्त  गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी जिल्हा  परिषदेच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत  विंधन विहिरी व कूपनलिका घेण्यात येतात; मात्र  मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस  झाल्यामुळे यापूर्वी घेण्यात आलेल्या विंधन विहिरी व  हातपंपाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आज रोजी अनेक  ठिकाणच्या विंधन विहिरी व हातपंप नादुरुस्त आहेत.   पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने काही वर्षांत ट प्प्याटप्प्याने गाव, वाड्या, वस्त्यांवर विंधन विहिरी  खोदून त्यावर हातपंप बसवले आहेत. हे हातपंप  सुरुवातीच्या काळात सुयोग्य पद्धतीने चालले; पण  देखभाल दुरुस्तीअभावी अनेक पंप, अनेक वर्षां पासून बंद पडले आहेत. त्यांचा वापर थांबल्याने पंप  गंजले, तुटले आहेत. तर येणार्‍या उन्हाळ्यात  जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे गावे व हवामानाचा  अंदाजानुसार यावर्षी पाणीटंचाईग्रस्त गावात विंधन  विहिरी व कूपनलिका घेण्यासाठी प्रस्ताव पाठवून उ पाययोजना करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील  संभाव्य १४0 गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी  १४९ कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या पैकी १0८ कामांना मंजुरी देऊन १0४ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत. त्यात ९२ ठिकाणी हातपंप  तर ५ ठिकाणी वीज पंप बसविण्यात आले आहेत. तर  ७ ठिकाणी पाणी खोल असल्याचे दिसून आले.