शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक पूल ठरतोय जीवघेणा

By admin | Updated: August 10, 2014 23:58 IST

धाड : प्रमुख मार्गावरील नागरी वस्तीस धोका

धाड : स्थानिक गावातून जाणार्‍या प्रमुख मार्गावरील पूल रहदारीसह नागरी वस्तीस धोक्याचा ठरला आहे. या पुलामुळे पावसाळ्यात नागरिकांना नैसर्गिक आपत्तीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून धाड गावाजवळून जाणार्‍या बाणगंगा नदीवर धामणगाव रोडवरील पुलामुळे आणि औरंगाबाद मार्गावरील नाल्यावरील पुलाने सतत पुराचे पाणी हे गावालगतच्या नागरी वस्तीत शिरते. सिमेंटची नळकांडे रचून तयार करण्यात आलेल्या पुलात वर्षानुवर्षे गाळ व काडीकचरा साचत असल्याने हा पूल बंद अवस्थेत असल्याने नदीला येणार्‍या पुराचे पाणी या ठिकाणी अडून ते नागरी वस्तीत शिरते, तर पुलावरून पाणी वाहण्याच्या प्रकाराने तासन्तास वाहतूक खोळंबते.साधारण १५ ते १८ वर्षांपूर्वी करडी आणि धाड या गावांच्या लगत असणारी कृषी क्षेत्राची जमीन संपादित करून करडी गावालगत धरणाची निर्मिती करण्यात आली. तत्कालीन स्थितीत गावाशेजारील रहिवासी जागाही धरणाकरिता संपादित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख मार्गावरील असणार्‍या पुलांची उंची व रस्ते वाढवून प्रशस्त असे पूल व रस्ते बांधकाम होणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन स्थितीत संबंधित कुठल्याच विभागाने या गंभीर विषयावर लक्ष न देता वेळ मारून नेली. परंतु त्याचे परिणाम मात्र नागरिकांना भोगावे लागत आहे. किमान एक कि.मी. पर्यंतचा धाड ते करडी मार्ग केवळ धरणाचे पाण्यामुळे सतत नादुरुस्त राहतो. जागोजागी त्यास खड्डे पडताना दिसतात. कारण रोडच्या लगत धरणाचे पाणी येऊन साचते. गेल्या काही वर्षात या रोडची अनेकदा बांधणी केल्या गेली; परंतु हा मार्ग नेहमीच खराब होतो. सध्या पावसाळी वातावरण असून, धाड ते करडी रोड पूर्णत: खराब झाला असून, यावर रोज अपघात घडत आहेत. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षात या ठिकाणी दोन्ही मार्गावर प्रशस्त उंचीचे पुलांच्या बांधकामासह रोडच्या बांधकामाची मागणी अनेकदा ग्रामस्थांनी करूनही संबंधित विभाग झोपेत आहे. सदर प्रकाराने या भागातील पूल आणि रस्ते आपत्तीसह जीवघेणे ठरत आहे.** क्षतिग्रस्त पुलाचे बांधकाम नाहीऔरंगाबाद रोडवर गावालगत असलेल्या नाल्यावरील पूल क्षतिग्रस्त झाल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सन २0१३ जूनमध्ये प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाचे कंत्राट ठेकेदारास दिले. या मार्गावरील असणारी वाहतूक पाहता या ठिकाणी प्रशस्त असा मोठा पूल बांधणे आवश्यक होते. मात्र संबंधित विभागाने घाईत या पुलाचे कंत्राट देऊन वेळ मारून नेली. परंतु तब्बल वर्षभराचा कालावधी उलटून गेला तरीही या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. वास्तवात या ठिकाणी रोडच्या दुतर्फा भागात धरणाचे पाणी येऊन साचते. ही बाब लक्षात असूनही बांधकाम खात्याने पुलाच्या होणार्‍या बांधकामावर मुळीच लक्ष दिले नाही. परिणामी हा पूल असून अडचणीचा ठरला आहे. तर धामणगाव रोडवरील पूल अजूनही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे.