शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

निवडणुकीच्या नावाखाली ‘दांडी’

By admin | Updated: October 10, 2014 00:11 IST

निवडणुकीची सबब आणि बुलडाणा येथील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट.

बुलडाणा : सारे इलेक्शनच्या कामात आहेत, कोणी भेटणार नाही, उद्या या, असे उत्तर आज विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम घेऊन आलेल्या लोकांना मिळत होते. कर्मचारी, अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते, तर पदाधिकारी नेत्यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी गेले होते. काही अधिकारी व कर्मचारी सकाळी कार्यालयात आले. त्यानंतर कोणीच फिरकलेच नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. ह्यलोकमतह्णने आज शहरातील शासकीय कार्यालयांची झाडाझडती घेतली असता, प्रामुख्याने ही स्थिती दिसून आली. निवडणुकीच्या कामकाजाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. ह्यइलेक्शन ड्युटीह्णच्या नावाखाली अनेक कर्मचारी कामचुकारपणा करीत असून, निवडणुकीचा बागुलबुवा करून कर्मचारी सर्वसामान्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा माहौल असला तरी ग्रामीण भागातील नागरिकांची कामे असतात. मात्र, अनेक कर्मचारी निवडणुकीच्या नावाखाली दांडी मारताना दिसत आहेत. * जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती निवडणुकीचे जिल्हास्तरीय सर्व कामकाज स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातून होत आहे. येथील निवडणूक विभागासह इतर सर्व विभागांतील कर्मचारी निवडणूक कामासाठी धावपळ करताना आढळून आले. मात्र, महत्त्वाच्या विभागात केवळ अधिकारी मंडळी उपस्थित होती. इतर कर्मचार्‍यांच्या खुच्र्या रिकाम्या होता, तर परिसरात नेहमीसारखा नागरिकांचा वावर नव्हता.झेडपीत शुकशुकाट जिल्हा परिषदेमध्ये आज अनेक विभागांमध्ये शुकशुकाट होता. एरवी जिल्ह्यातील राजकीय गणितांची जुळवाजुळव आणि विकासकामाच्या चर्चा व अंमलबजावणीचे काम प्रत्येक टेबलावर होत असते. मात्र, येथील अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे विविध विभागांत शुकशुकाट पसरला होता. एका विभागात दोन-तीन कर्मचारी टेबलावर दिसून आले. शिक्षण विभागाला भेट दिली असता, एकही कर्मचारी नव्हता.*तहसील कार्यालयावर कामाचा व्याप बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थानिक तहसील कार्यालयातून राबविली जात आहे. यासाठी कार्यालयातील ३३ कर्मचार्‍यांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज येथे जवळपास सर्व कर्मचारी उपस्थित होते; मात्र कार्यालयात पुरवठा, नक्कल विभाग आणि सेतू कार्यालयातील काही टेबल रिकामे असल्यामुळे विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय झाली. त्याचा आर्थिक फटकाही त्यांना बसला.* पंचायत समितीचे टेबल रिकामयेथील ४0 टक्के कर्मचार्‍यांच्या निवडणुकीसाठी ड्युट्या लागल्या आहेत, तर इतर कर्मचारी दुपारी जेवणाच्या निमित्ताने गेले, ते आले नाहीत, अशी माहिती पंचायत समितीत उपस्थित एका चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याने सांगितले. शिवाय नेत्यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी गेल्यामुळे सर्व सभापतींचा कक्षही रिकामा होता. त्यामुळे पंचायत समितीच्या विविध विभागांत शुकशुकाट दिसून आला.