शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

‘दामिनी’च्या सतर्कतेमुळे सावरले ‘तिचे’ आयुष्य!

By admin | Updated: October 2, 2016 02:35 IST

प्रियकराला चोप; धुळे जिल्ह्यातील युवतीला केले आईच्या स्वाधीन.

अनिल गवई खामगाव (जि.बुलडाणा), दि. १- शिक्षणासाठी आई- वडिलांपासून दूर असलेली युवती एका भिन्न धर्मीय युवकाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली. या गोष्टीचा लाभ उठवित सदर युवकाने तिला खामगाव परिसरात फिरायला आणले. दरम्यान, दामिनी पथकाची नजर या प्रेमीयुगलावर पडली. चौकशीतील सतर्कतेमुळे अखेरीस सदर युवतीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील नेर येथील कविता (बदललेले नाव) ही युवती उच्च शिक्षणासाठी धुळे येथे वास्तव्यास आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपूर्वी कविताचे जोसेफ (बदललेले नाव) या युवकाशी सूत जुळले. १५ दिवसांच्या अल्प कालावधीतच कविता जोसेफ सोबत बुधवारी धुळे येथून मोटारसायकलवर पळून आली. बुधवारी शेगाव येथे फिरत असताना, सायंकाळच्या निवार्‍यासाठी दोघेही ह्यलॉजह्ण शोधत होते. दरम्यान, यादिवशी प्रेमीयुगलाच्या वास्तव्यावरून तणाव निर्माण झाल्याने, या युगलाला शेगावात ह्यलॉजह्ण उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हे प्रेमीयुगुल खामगाव येथे आले. या ठिकाणीही त्यांना जागा उपलब्ध न झाल्याने, मलकापूरच्या दिशेने निघालेल्या या जोडप्याला दामिनी पथकाने ताब्यात घेतले. यावेळी तरुणीची कसून चौकशी केली असता, सुरुवातीला तरुणीने उडवा-उडवीची उत्तरे दिली. दरम्यान, दामिनी पथकातील सदस्यांनी या तरुणीला खाक्या दाखविताच, तिने आपल्याबद्दलची सर्व हकिकत कथन केली. चौकशीत तरुणी ही धुळे जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्याने, तिच्या आईशी संपर्क साधण्यात आला. युवकाला चोप देत, दामिनी पथकाने चांगलीच अद्दल घडविली. दरम्यान, कविताला प्रेमाच्या जाळय़ात ओढणारा युवक आधीच दुसर्‍या युवतीशी ह्यएन्गेजह्ण असल्याचे बिंग फुटले. त्यामुळे या युवतीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे दामिनीच्या सतर्कतेमुळे कविताचे आयुष्य सावरले आहे. रात्र झाल्याने या युवतीच्या आईला यायला विलंब लागणार असल्याचे लक्षात घेता, दामिनी पथकातील एका महिला सदस्याने कविताला रात्रभर घरी ठेवून, माणुसकी धर्माचाही प्रत्यय या घटनेच्या निमित्ताने दिला.