बुलडाणा : जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करा, शेतकर्यांना हेक्टरी ५0 हजार रुपये आर्थिक मदत द्या, सोयाबीनला प्रति िक्वंटल ६ हजार, तर कापसाला ९ हजार रुपये भाव द्यावा, शे तकर्यांना कर्जमुक्ती व वीज बिल माफ करा, शेतकर्यांना एकरी ३0 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज द्या या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थी संघटनेचे राणा चंदन, स्वाभिमानी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजपूत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनायक वाघ यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे
By admin | Updated: November 22, 2014 23:50 IST