शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांचा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 14:41 IST

जिल्ह्यात गतवर्षामध्ये सायबरचे सुमारे ३८ गुन्हे समोर आले आहेत.

- सोहम घाडगे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सायबर गुन्ह्यांच्या विळख्यात जिल्हा सापडत आहे. जिल्ह्यात गतवर्षामध्ये सायबरचे सुमारे ३८ गुन्हे समोर आले आहेत. यामध्ये आॅनलाइन फसवणूकच २३ लाख १० हजार ७८६ रुपयांपर्यंत पोहचली आहे.सर्वसामान्यांपासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांकडूनच आज इंटरनेटचा वापर वाढला आहे. परंतू या इंटरनेटच्या अतिवापरात लोकांचा पैसा आणि गोपनियतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही जिल्ह्यात वाढले आहे. बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम बंद होणार, पीन नंबर सांगा यासारखे फोन करून बँकेतील खात्याची माहिती घेणारे अनेक जण आज दिसून येतात. त्यांच्याकडून होणारी आॅनलाइन आर्थिक फसवणूक आज जिल्ह्यात वाढली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षभरामध्ये ३८ गुन्हे उघड झाले आहे. त्यामध्ये २३ लाख १० हजार ७८६ रुपयांची फसवणूक झाल्याचे गुन्हे बुलडाणा जिल्हा सायबर सेलकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सायबर सेलकडून कारवाई करण्यात येत आहे.फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅपच्या ३२ तक्रारीफेसबूक आणि व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मिडीयाचा वापर सध्या वाढलेला आहे. फेसबूक आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून गुन्ह्यांचे प्रमाणही आज वाढले आहे. जिल्हाभरातून जवळपास ३२ तक्रारी फेसबूक आणि व्हॉट्स अ‍ॅपच्या आलेल्या आहेत. त्यातील फेसबूकवरील प्रकरणांच्या २७ तक्रारी व व्हॉट्स अ‍ॅपवरील पाच तक्रारी सायबर सेलला प्राप्त झाल्या आहेत. यातील फेसबुकवरील आलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा सायबर सेलकडून लावण्यात आला आहे. परंतू व्हॉट्स अ‍ॅपवरील तक्रारींचा निपटारा सायबर सेलही लावू शकले नाही. आवश्यक तो डाटा न मिळाल्याने जिल्ह्यातील व्हॉट्स अ‍ॅपवरील सायबर गुन्ह्यांचा तपास आतापर्यंत लागला नाही. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून महिलांचा विनयभंग, समाजात तेढ निर्माण करणे, सासारखे गुन्हे सध्या घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी सायबर सेलकडून प्रयत्न केल्या जातात.

महिलाही ठरताहेत सायबर गुन्ह्यांचे शिकारआॅनलाइन फसवणूक किंवा व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक हॅक करणे यावरख सायबर गुन्हे थांबले नाहीत. या गुन्ह्यांचे शिकार महिलाही ठरत आहेत. जिल्ह्यात महिला संदर्भातील १० सायबर गुन्हे समोर आले आहेत. यामध्ये विनयभंग, महिलांना फोन करून किंवा मॅसेज करून त्रास देणे, यासारखे गुन्हे उघड झाले आहेत. यावरही सायबर सेल वॉच ठेऊन आहे.ज्या नागरिकांचे आॅनलाइन एटीएमद्वारे ओटीपी शेअर करून किंवा त्यांचे संमतीशिवाय बचतखाते, क्रेडीट कार्ड किंवा पेटीएम अशा तत्सम प्रकारे रक्कम अज्ञात व्यक्ती ट्रान्सफर करतात. अशावेळी संबधित नागरिक सायबर पोलीस स्टेशनला येऊन तातडीने तक्रार नोंदवतात. त्यांची आॅनलाइन गेलेली रक्कम सायबर टीमच्यावतीने पाठपुरावा करून परत आणण्यात येते. जास्त कालावधी झाल्यानंतर अज्ञाताकडून पैसे विड्रॉल करण्यात येतात.- प्रदीप ठाकूर, पोलीस निरिक्षक,सायबर सेल, बुलडाणा.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcyber crimeसायबर क्राइम