शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

जामोद येथे संचारबंदी शिथिल

By admin | Updated: April 20, 2016 02:01 IST

जनजीवन पूर्वपदावर; पोलिसांनी काढला गावक-यांसोबत शांतीमार्च.

जामोद (जि. बुलडाणा): येथे शनिवारी रात्रीपासून लावलेली संचारबंदी मंगळवारी शिथिल करण्यात आली असून, मंगळवारी सकाळी ९.३0 वाजता कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने सर्वधर्मीय तथा सर्वपक्षीय शांतीमार्च काढण्यात आला. या शांतीमार्चला बसथांब्याजवळून सुरुवात झाली. त्यानंतर हा शांतीमार्च सुभाष चौक, बेंबळेश्‍वर मंदिर, जैन मंदिर परिसरातून पेठपुरा, पोलीस चौकी रोड ते मशीदजवळून पुन्हा सुभाष चौकातून बस थांब्याजवळ आल्यानंतर शां तीमार्चचे विसर्जन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर यांनी गावकर्‍यांना आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु करून शांतता राखण्याचे आवाहन केले. या शांतीमार्चमध्ये जिल्हाधिकारी डॉ.विकास झाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, तहसीलदार अनिलकुमार हेडकर, ठाणेदार विजय पाटकर, माजी जि.प.सदस्य कैलास बोडखे, माजी जि. प.अध्यक्ष प्रकाश पाटील, खालीकबाप्पु देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, बाबू जमादार, जि.प.सदस्य सुरेश अंबडकार, पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे, आशा डाबेराव, सरपंच झुमकी चन्नीलाल, पोलीस पाटील रतनलाल गांधी, भारिप- बमसं तालुकाध्यक्ष अरुण पारवे, हुसेन डायमंड, राजू कोकाटे, अमानसेठ जळगाव, पुरुषोत्तम राठी, अनिल चांडक, मुजम्मील खान नांदुरा, नगर परिषद उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे, कैलास डोबे, ग्रा.पं.सदस्य पुष्पा धुर्डे, सुमित्रा कपले, माजी सरपंच पुंडलीक ढगे, युसूफ मेंबर, विजय वानखडे, मोठय़ा संख्येने पोलीस ताफा, पत्रकार तथा गावातील बहुसं ख्य हिंदू-मुस्लीम तथा महिला बहुसंख्येने उपस्थित होते.