लोकमत न्यूज नेटवर्कउमाळी : बकरी ईदनिमित्त सुटीवर आलेल्या सीआरपीएफ जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उमाळी येथे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.शे.अजीज शे.लतीफ हा तीन वर्षांपूर्वी सीआरपीएफमध्ये भर ती झाला. दरम्यान, तो बकरी ईदनिमित्त सुटी घेऊन गावी आला होता. रविवारी गावातील काही मित्रांसोबत तो पोहण्यासाठी गेला. शे.हमजा शे.नथ्थू यांच्या शेतातील विहिरीत पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबत बिसमील्ला खान व नसीरखान यांनी मलकापूर शहर पो.स्टे.ला माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी विहिरीवर तीन मोटारपंप लावून पाण्याचा उपसा करण्यात आला. यानंतर प्रेत पंचनामा करण्यात आला असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
‘सीआरपीएफ’ जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:18 IST
उमाळी : बकरी ईदनिमित्त सुटीवर आलेल्या सीआरपीएफ जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उमाळी येथे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
‘सीआरपीएफ’ जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू
ठळक मुद्देउमाळी येथील घटनाबकरी ईदनिमित्त आला होता सुटीवर