शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दांडी मारल्याने पिके धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST

उंद्री ते किन्ही सवडत रस्त्याची दुरवस्था अमडापूर : उंद्री ते किन्ही सवडत, पिंप्री काेरडे रस्त्यावर गत काही दिवसांपासून माेठ्या ...

उंद्री ते किन्ही सवडत रस्त्याची दुरवस्था

अमडापूर : उंद्री ते किन्ही सवडत, पिंप्री काेरडे रस्त्यावर गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे.

पाणी पाझरल्यामुळे पिकांचे नुकसान

सिंदखेड राजा : पावसाचे पाणी खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यातून शेतकऱ्यांच्या शेतात पाझरल्याने जवळपास २० एकरांमधील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी हाेत आहे.

पुलाचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी

साखरखेर्डा : परिसरात या वर्षी जाेरदार पाऊस हाेत आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येत आहेत. अनेक पूल लहान असल्याने वाहतूक ठप्प हाेते. भोगावती नदीवरील पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले असून, काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या पूर्ववत करा!

चिखली : कोरोना महामारीच्या काळात चिखली आगारातील अनेक बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने चिखली आगारप्रमुखाकडे केली आहे.

माेताळा ते खरबडी रस्त्याची दुरवस्था

खरबडी : खरबडी ते माेताळा रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़

घरकुल याेजनेची कामे संथगतीने

खरबडी : गरजू लाेकांसाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत खरबडी या गावामध्ये अंदाजे ८०-८५ घरकुलांना मंजुरी मिळाली असून, २०२२ पर्यंत घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होणे गरजेचे आहे, अशी शासनाची अट आहे; परंतु खरबडी या गावात याेजनेची कामे संथगतीने हाेत असल्याचे चित्र आहे.