शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील गुन्हेगार बुलडाणा जिल्ह्यात झाले सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:03 IST

विशेष म्हणजे यामधील एक आरोपी खिसेकापू आहे तर एक आरोपी हा सोन साखळी चोरणारा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बीड जिल्ह्यातील गुन्हेगार बुलडाणा जिल्ह्यात सक्रीय झाले असल्याचे सध्या चित्र असून गेल्या दहा दिवसात बीड जिल्ह्यातील दोन चोरट्यांना बुलडाणा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर अटक केल्याने हे वास्तव समोर येत आहे. विशेष म्हणजे यामधील एक आरोपी खिसेकापू आहे तर एक आरोपी हा सोन साखळी चोरणारा आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही परस्पर संबंध आहेत का? याचाही सध्या स्थानिक गुन्हे शाखा तपास करत आहेत. विशेष म्हणजे खिसेकापू असलेल्या  अेामप्रकाश उर्फ उमेश मुरलीधर गवळी (रा. नळवंडी नाका, राजूनगर, बीड) याने बुलडाणा, खामगाव आणि चिखली येथे गुन्हे केले असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने थेट परळी येथे छापा टाकून २६ नोव्हेंबरलाच अटक केलेला अैालाद हुसैन जावेद हुसैन जाफरी उर्फ रोशन हा सोन साखळी चोर आहे. दहा दिवसांच्या अंतराने या दोघांना अटक करण्यात आल्याने बुलडाणा जिल्ह्यात परजिल्ह्यातील चोरटे सक्रीय असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील तीन चोरटे हे अैारंगाबाद जिल्ह्यात कार चोरी प्रकरणात अटक झाले आहे.   मराठवाड्याच्या सीमे लगतच्या धाड परिसरातील हे रहिवाशी आहे. त्यामुळे बीड, बुलडाणा, अैारंगाबाद जिल्हा एक प्रकारे गुन्हे करण्याचे या आरोपींचे कार्यक्षेत्र असल्याचे समोर येत आहे. 

अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताबीड जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्रसंगी आंतरजिल्हास्तरावर गुन्हे करण्यात येत असावे असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे पोलिस तपासात त्यांच्याकडून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील धाड परिसरात राहणाऱ्या व चिखली येथून अटक करण्यात आलेल्या बाप लेकांच्या टोळीचेही आंतरराज्यस्तरावर कार चोरीच्या प्रकरणात संबंध असावे असा कयास  अैारंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पोलिसांना आहे. त्यांच्या चौकशीत बऱ्याच बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBeedबीड