जानेफळ (बुलडाणा): हुंड्याच्या पैशाच्या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडूनमारहाण व शारीरीक आणि मानसिक छळ होत असल्याने त्रासाला कंटाळून बहिणीनेआत्महत्या केल्याच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हेदाखल करण्यात आले आहे.जानेफळ येथील कल्पना वसंत लोणकर या २१ वर्षीय विवाहितेने २४ मार्च रोजीराहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी कल्पना यांचा भाऊगणेश गायकवाड यांनी पोलिसात तक्रार दिली असून, बहिणीच्या आत्महत्येलासासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. कल्पना हिला पती वसंतानामदेव लोणकर, सासू लिलबाई नामदेव लोणकर, नणंद मंदा नामदेव लोणकर त्रासदेत होते. त्यामुळे कल्पनाने यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली.या तक्रारीवरून वसंता लोणकर, नामदेव लोणकर, मंदा लोणकर यांच्याविरूद्धकलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा
By admin | Updated: March 27, 2017 13:46 IST