लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विषयी अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी येथील भाजपचे नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यासंदर्भात सकल मराठा समाजाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली होती.खामगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या विषयी वृत्त वाहिनीवर वृत्त दाखविले जात असताना खामगावचे नगरसेवक ओम शर्मा यांनी याबाबत सोशल मिडीयावर उदयनराजे व त्यांच्या समर्थकांना खालच्या स्थरावर जावून शिवीगाळ केली व अपमान केला. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून शर्मा यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सदर तक्रार वजा निवेदन प्रविण कदम, किशोर भोसले, सुभाषराव कोल्हे आदिंनी दिले असून त्यावर शेकडो समाज बांधवांच्या सह्या आहेत. दरम्यान याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ५००, ५०७ भादंविनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
उदयनराजे भोसले यांच्या अवमानप्रकरणी भाजप नगरसेवकाविरूध्द गुन्हा
By ram.deshpande | Updated: July 26, 2017 19:01 IST
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विषयी अवमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी येथील भाजपचे नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यासंदर्भात सकल मराठा समाजाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली होती.खामगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, खासदार उदयनराजे ...
उदयनराजे भोसले यांच्या अवमानप्रकरणी भाजप नगरसेवकाविरूध्द गुन्हा
ठळक मुद्दे सकल मराठा समाजाच्यावतीने दाखल करण्यात आली होती तक्रार!