शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

नांद्राकोळीच्या २0 जणांवर गुन्हा

By admin | Updated: March 11, 2016 02:53 IST

अविश्‍वास प्रस्ताव प्रकरणी नऊ जणांना जामीन मिळाला.

बुलडाणा : तालुक्यातील नांद्राकोळीचे सरपंच यांच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव सभेसाठी आलेल्या ८ ग्रामपंचायत सदस्यांवर तसेच उपस्थित पोलिसांवर सरपंच सर्मथकांनी हल्ला केल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांत रात्री उशिरा २0 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी ९ लोकांना अटक करण्यात आली. नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्यांनी डॉ. हरिदास रामकृष्ण काळवाघे यांना सरपंच म्हणून निवडले. मात्र, सरपंच काळवाघे अन्य ग्रा.पं. सदस्यांना विश्‍वासात न घेता, मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत नांद्राकोळी येथील १0 ग्रा.पं. सदस्यांनी बुलडाणा तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे अविश्‍वास प्रस्ताव सादर केला. तहसीलदार बाजड यांनी अविश्‍वास प्रस्तावावर ९ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन केले. निर्धारित वेळेच्या १0 मिनिटाआधी या सभेत सहभागी होण्यासाठी एमएच २८ व्ही ६१६७ क्रमांकाच्या क्रुझर जीपने ८ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत भवनात पोहोचले. दरम्यान, तेथे उपस्थितीत सरपंच सर्मथकांनी जीपवर हल्ला करून आत बसलेल्या ग्रा.पं. सदस्यांना मारहाण करणे सुरू केले. बचावासाठी पोलीस कर्मचारी धावले असता, त्यांनाही सर्मथकांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस पथकासह गावात दाखल झाले. या प्रकरणी काल रात्री उशिरा ग्रामपंचायत सदस्य मनोज सुभाष जाधव यांच्या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी सरपंच डॉ.हरिदास काळवाघे, मंगला तायडे यांच्यासह २0 लोकांवर भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३६३, ४४७, ४२७, ३२३, ५0६ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.