शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एका आदर्श गावाची निर्मिती..

By admin | Updated: August 10, 2014 18:21 IST

बुलडाणा अर्बनचा उपक्रम : डोंगरखंडाळा गावाची वाटचाल शहरीकरणाकडे

बुलडाणा: चकचकीत सिमेंटचे रस्ते, रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्या, रस्त्यालगत बहरलेली जांभळाची झाडे, पाच रुपयात १५ लीटर शुद्ध पाणी देणारे एटीएम, सूतगिरणी, कापडगिरणी, सिमेंटचे छत असलेली घरकुले, हे चित्र एखाद्या शहरातील नाही, तर बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावाचे हे बदललेले रूप आहे. संपूर्ण आशिया खंडात सोशल बँकिंगचा वस्तुपाठ घालून देणार्‍या बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीने घेतलेल्या ग्राम समृद्धीच्या ध्यासाचे हे वास्तव स्वरूप आहे. खेड्यांमध्ये शहरांमधील सुविधा उपलब्ध करून देत, ग्रामीण भागातून शहरांकडे वाहणारे लोंढे थांबवून शहरांचे बकालीकरण रोखण्याची चर्चा अलीकडे सुरू झाली आहे. हा विकास अवघ्या पाच कोटी रुपयांमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीने डोंगरखंडाळा गावात त्याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. केवळ शहरी भागातील सुविधा उपलब्ध करून देण्यावरच हा प्रयोग थांबलेला नाही, तर गावाचा आर्थिक विकास घडवित गावातच रोजगार निर्मितीचाही प्रयत्न सुरू आहे. एखाद्या पतसंस्थेने स्वयंस्फूर्तीने गावाचा विकास करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न असावा. बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी डोंगरखंडाळा या त्यांच्या जन्मगावाचा विकास करण्याचा ध्यास घेतला. ग्रामस्थांना विश्‍वासात घेतले व गावकर्‍यांकडून एक रुपयाचीही मदत न घेता, फक्त त्यांच्या सहकार्यातून गावात विकासाचे पर्व सुरू केले आहे. पतसंस्थेने गावातील रस्त्यांपैकी ८0 टक्के रस्ते सिमेंटचे केले आहेत. स्वच्छतेतून समृद्धीचा वसा अधिक बळकट व्हावा म्हणून गावात शौच्चालय बांधणार्‍या प्रत्येक कुटुंबास संस्थेकडून दोन हजार रुपये अनुदान दिले जाते. आतापर्यंत ३४८ कुटुंबांनी या अनुदानाचा लाभ घेतला आहे. रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्यांवर विशेष भर देत असतानाच, संपूर्ण गावात जांभळाची तब्बल १,२00 झाडे लावण्यात आली आहेत. जांभूळ हे मधुमेहावरील प्रभावी औषध मानल्या जात असल्याच्या पृष्ठभूमीवर, भविष्यात हे गाव मधुमेहमुक्त व्हावे, हा संदेश देण्यासाठीच जांभळाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्याच्या घरासमोर जांभळाचे झाड लावले आहे, त्याने ते झाड एक वर्ष जगविल्यास त्याला संस्था एक हजार रुपये बक्षीस देणार आहे. त्यामुळे लावलेली सर्व झाडे डौलाने बहरत आहेत. याबाबत या गावचे सरपंच किशोर चांडक यांनी सांगितले की, ही संपूर्ण संकल्पना राधेश्याम चांडक यांची असली तरी, यामागील तांत्रिक जबाबदारी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी सांभाळली आहे. त्यांनी या गावासाठी अनेक उपक्रम संकल्पित केले असून, येणार्‍या काळात डोंगरखंडाळा हे महाराष्ट्रातील मॉडेल गाव म्हणून समोर येईल, असा विश्‍वास ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.