शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील गाळ काढताना क्रेन पडून एक ठार

By admin | Updated: May 20, 2016 01:56 IST

मलकापूर तालुक्यातील घटना.

मलकापूर (जि. बुलडाणा) : विहिरीचे खोदकाम सुरू असताना विहिरीतील गाळ वर आणण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन विहिरीत पडल्याने खाली असलेल्या मजुरांपैकी एक मजूर जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मलकापूर तालुक्यातील मौजे वडोदा येथे १९ रोजी सकाळी ६.३0 वाजेच्या सुमारास घडली.वडोदा येथील रहिवासी नितीन अमृत देशमुख यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. बुधवारी या विहिरीतील काम आटोपल्यानंतर क्रेन दुसर्‍या बाजूला बसवून मजूर निघून गेले. वाढत्या तापमानामुळे गुरुवारी सकाळीच काम सुरु करण्यासाठी शशिकांत निंबाजी काटकर (वय २५), क्रेनचालक नितीन अमृत देशमुख (वय ३२) व शे.दाऊद शे.कलंदर (वय ३६) या तिघांनी सकाळीच काम सुरु केले. विहिरीत क्रेनला लटकविलेल्या साबळीमध्ये विहिरीतील गाळ भरुन साबळी वर पाठविली. त्यावेळी ही साबळी काही उंचावर गेल्यानंतर क्रेनसह विहिरीत कोसळली. क्रेन बसविताना क्रेनवर अतिरिक्त वजन ठेवले नसल्यामुळे हा अपघात झाला आहे. या घटनेत शशिकांत काटकर हा तरुण जागीच ठार झाला, तर क्रेनचालक नितीन देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जळगाव खांदेश येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शे.दाऊद शे.कलंदर या जखमी मजुरावर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या घटनेची वार्ता कळताच अँड.हरीश रावळ, संतोष रायपुरे, गजानन ठोसर, विजय गायकवाड, आदींसह गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी मलकापूर येथे हलविले. क्रेन हलगर्जीपणे व निष्काळजीपणे चालविल्यामुळे साबळीसह क्रेन विहिरीत पडून मरणास व जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वडोदा येथील संजय दत्तू काटकर वय ४१ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अप नं. ६५/१६ कलम ३0४ अ, ३३७, ३३८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.