शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला निधी परतीचा न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: August 27, 2016 03:03 IST

नांदुरा व मलकापूर पालिकेचा ३२ कोटींचा निधी सा.बां. विभागाकडे झाला होता वळता.

नांदुरा/मलकापूर, दि. २६ : नगरविकास विभागाचे अवर सचिव यांनी १३ जून रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना मलकापूर व नांदुरा नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण व विशेष रस्ता अनुदान या कामांची कार्यान्वयीन यंत्रणा नगरपरिषदेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग करण्याबाबतचे निर्देश उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी २६ ऑगस्ट रोजी रद्द करून जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी आठ दिवसांच्या आत नगर परिषद मलकापूर व नांदुरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केलेली रक्कम अनुक्रमे १६.५ कोटी व १५.५ कोटी नगर परिषदेच्या खात्यात वळती करण्याचा आदेश दिला आहे.मलकापूर व नांदुरा नगर परिषदेला अनुक्रमे वैशिष्ट्यपूर्ण व विशेष रस्ता अनुदानांतर्गत अनुक्रमे १६.५ कोटी व १५.५ कोटी नगर परिषदेला शासनाकडून प्राप्त झाले होते. दरम्यान, अवर सचिव यांच्या आदेशाने सदर निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती करण्याबाबत निर्देश अवर सचिवांनी दिले होते. दरम्यान, या प्रकरणी निधीतून कोणती विकास कामे करायची हे ठरविण्याचा अधिकार नगर पालिकेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने कार्यान्वयीत यंत्रणा बदलविण्याचे दिलेले निर्देश स्थानिक आमदार यांच्या दबावाखाली दिले असल्यामुळे सदरचा आदेश रद्द करण्याबाबत मलकापूर नगर परिषदेचे काँग्रेसचे स्वीकृत सदस्य देवेंद्र वानखेडे यांनी उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका ८६/२0१६ दि.१८ जून रोजी, तर २३ जून रोजी नागपूर खंडपीठातच नांदुरा येथील नवृत्ती दिनकर इंगळे यांनीही याचिका दाखल केल्यानंतर अवर सचिव यांच्या आदेशाला २१ जून रोजी स्थगिती मिळविली होती. तसेच सदर प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी न्यायमूर्तीव्दय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी अंतिम सुनावणी घेऊन सरकारी व याचिकाकर्त्यांंची बाजू ऐकून घेत उच्च न्यायालयाने अवर सचिव यांचे १३ जून रोजीचे पत्र स्थानिक आमदारांच्या हस्तक्षेपामुळे व प्रभावामुळे पाठविले असल्याचे मत नोंदवित राज्य सरकारला अशाप्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे आपल्या निकालात नमूद केले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या १४ जून रोजीच्या पत्रान्वये नगर परिषद मलकापूर व नांदुरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा केलेली रक्कम आठ दिवसांच्या आत पालिकांच्या खात्यात वळती करण्याचा आदेश पारित केला. देवेंद्र वानखडे यांच्यावतीने मिश्रा, राहुळकर, नवृत्ती इंगळे यांच्यावतीने मार्डीकर व जैन, मलकापूर न.प.च्यावतीने देशमुख व नांदुरा न.प.च्यावतीने पाटील व सरकारच्यावतीने अँड. भारती डांगरे यांनी बाजू मांडली.