शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसकडून न्यायालयाचा अवमान; निव्वळ पब्लिसिटी  स्टंट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:24 IST

विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष  शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू  नये, असा मनाई हुकूम २00१ मध्ये अकोल्याच्या  सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचे  उल्लंघन अंनिसचे श्याम मानव व त्यांचे सहकारी करत  असून, हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असून,  साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ पब्लिसिटी  मिळविण्याचा खटाटोप असल्याचे प्रत्युत्तर विवेकानंद  आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी  पत्रकार परिषद घेऊन दिले.

ठळक मुद्देशुकदास महाराजांवरील आरोपांना विवेकानंद आश्रमाकडून  प्रत्युत्तर अपशकून केल्यापेक्षा संमेलनाला या! 

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष  शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू  नये, असा मनाई हुकूम २00१ मध्ये अकोल्याच्या  सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचे  उल्लंघन अंनिसचे श्याम मानव व त्यांचे सहकारी करत  असून, हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असून,  साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ पब्लिसिटी  मिळविण्याचा खटाटोप असल्याचे प्रत्युत्तर विवेकानंद  आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी  पत्रकार परिषद घेऊन दिले.९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हिवरा आश्रम येथे  आयोजित करणे निश्‍चित झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समि तीने आयोजक विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष  शुकदास महाराज यांच्यावर आरोप केले. त्या आरोपांना  विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी उत्तर दिले.  पत्रकार परिषदेत संतोष गोरे म्हणाले, की  कोट्यवधी  व्याधीग्रस्तांना अँलोपॅथीसारख्या अतिउच्च चिकित्सापद्ध तीद्वारे व्याधीमुक्त करणारे कुशल शुकदास महाराज यांनी आ पले जीवन व्यतीत केले. त्यांनी कधीही कुणाचे शोषण केले  नाही, फसवणूक केली नाही. धर्माच्या नावाने अंधश्रद्धेला  खतपाणी घातले नाही. वेदान्त आणि विज्ञान यांची सांगड  घालून त्यांनी आरोग्य, दीन-दलित, पीडितांची सेवा,  कृषीविकास, शिक्षण, अध्यात्म आणि सेवा या क्षेत्रात  डोंगराएवढे काम उभे केले. विवेकानंद आश्रमाच्या रूपाने या  क्षेत्रात संस्थात्मक काम केले जात असून, दरिद्री, पीडित,  रोगी, हेच आमचे देव आहेत. या देवाची सेवा करणे हाच  महाराजांनी घालून दिलेला आमच्या पुढचा आदर्श आहे.  त्याच आदर्शावर पूज्यनीय महाराजांनी वाटचाल केली. संस् था त्याच आदर्शावर वाटचाल करत आहे, असा विश्‍वासही  गोरे यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, की सहदिवाणी न्यायाधीश, अकोला यांनी  १५ डिसेंबर २00१ च्या विवेकानंद आश्रमाच्या याचिकेवरील  निकालात ठळकपणे शुकदास महाराज अथवा विवेकानंद  आश्रमाविरोधात कोणत्याही हेतूने, कोणत्याही माध्यमांद्वारे  बदनामीकारक वक्तव्ये करू नये, असा मनाई हुकूम जारी  केलेला आहे. यापूवीर्ही दोन वेळा आपण अशाप्रकारे  पूज्यनीय महाराजांवर चिखलफेक करणारे, त्यांचे  चारित्र्यहनन करणारे आरोप केले आहेत. या आरोपांना आ पणाकडून ‘भंडाफोड’ असे म्हणण्यात येत आहे.  सहदिवाणी न्यायालयाचा आदेश आमच्या बाजूने अस तानाही होत असलेल्या आरोपांकडे आम्ही जाणीवपूर्वक  दुर्लक्ष करत आलोत; परंतु आता जेव्हा ९१ वे अखिल भार तीय साहित्य संमेलन विवेकानंद आश्रमात आयोजित करणे  प्रस्तावित आहे. यावेळी करण्यात आलेले आरोप हा  न्यायालयाचा अवमान असून, आपणाविरोधात न्यायालयीन  अवमाननेची याचिका कोर्टात दाखल करण्यात येणार आहे,  असा इशाराही गोरे यांनी दिला आहे.

अपशकून केल्यापेक्षा संमेलनाला या! विवेकानंद आश्रम आणि साहित्यरसिक हा सोहळा यशस्वी  करण्यासाठी सर्मथ आहेत. श्याम मानव व त्यांच्या  सहकार्‍यांनी चांगल्या कार्याला अपशकून करणे सोडून द्यावे.  स्वत: मानव व त्यांच्या सहकार्‍यांना या साहित्य संमेलनाचे  सहर्ष निमंत्रण देत आहोत. त्यांनी सारस्वतांच्या या प्रांगणात  आणि पूज्यनीय शुकदास महाराजांच्या तपोभूमीत आवर्जुन  यावे, साहित्यरसिकता अनुभवावी, असेही संतोष गोरे  म्हणाले.