पिपळगाव शिवारात किन्ही पवार येथील मधुकर हिम्मतराव लंके हे २२ जूनला मशागतीचे काम करीत हाेते़ यावेळी तेथे रामराव सरोदे, कैलास सरोदे, राहीबाई सरादे, सागरबाइ सरोदे (सर्व, रा. किन्ही पवार) हे तेथे आले़ त्यांनी आमच्या शेतात वखर हाणू नकाे म्हणून वाद घातला़ तसेच लोखंडी गज उजव्या हातावर मारला़ तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली़ पत्नी सोडविण्यास आली असता तिलासुद्धा मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याने लंके यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ या प्रकरणी देउळगावराजा पाेलिसांनी चारही आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास देउळगावराजा पाेलीस करीत आहेत़
शेतीच्या वादातून दाम्पत्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST