शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय खरेदी केंद्र बंद असल्याने कापूस घरात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 16:40 IST

Khamgaon News शासकीय खरेदी केंद्र अद्यापही सुरून झाल्याने कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात रखडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : तालुक्यात कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. कापूस वेचणीला महिन्यापासून प्रारंभ झाला. मोठ्या प्रमाणात कापसाची वेचणी होऊन कापूस शेतकºयांच्या घरात येऊन पडला आहे. मात्र, कापूस खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र अद्यापही सुरून झाल्याने कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात रखडली आहे.या परिस्थितीचा गैरफायदा अनेक व्यापारी घेत असून, कमी भावाने कापसाची विक्री शेतकºयांना करावी लागत आहे. याचा मोठा फटका शेतकºयांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कापूसही चांगला बहरला. गेल्या महिनाभरापासून कापसाची वेचणी सुरू झाली आहे. मध्यंतरी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात कापूस भिजल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. मात्र, पुन्हा पाऊस उघडल्यानंतर कापूस वेचणी जोमाने सुरू झाली. आता कापासाची वेचणी होऊन मोठ्या प्रमाणात कापूस शेतकºयांकडे उपलब्ध आहे. मात्र, अद्यापही शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू झालेले नाही.कापसाची ऑनलाईन नोंदणीही सुरू झालेली नाही. वेचून ठेवलेला कापूस दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांना हातभार ठरतो. जर शासनाने दिवाळीपूर्वीच कापूस खरेदी केली असती, तर शेतकऱ्यांना कापसाचे पैसे दिवाळीसाठी मिळाले असते व शेतकºयांची दिवाळी गोड झाली असती. मात्र,शासनाने खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उशीर केल्याने मोठ्या प्रमाणात कापूस घरातच पडून आहे. दिवाळी सणाच्या पाश्वभूमीवर अनेक शेतकºयांनी आपला कापूस पडत्या भावाने व्यापाºयांना कमी भावाने विकला. शेतकºयांना याचा आर्थिक फटका बसला आहे. खरेदी केंद्र सुरू होणार नाही. तोपर्यंत 'दलालांचं चांगभलं अशी स्थिती राहणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती