नांदुरा : तालुक्यातील वडनेर भोलजी येथील रहिवासी गजानन राजाराम जुमडे या ५५ वर्षीय इसमाचा खून झाल्याची घटना आज २0 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन जुमडे हे वडनेर बस थांब्यामागील पर्हाटीच्या शेतात मृत अवस्थेत आढळले. इसमाचा अत्यंत निर्दय पणे धारदार शस्त्राने खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तीक्ष्ण हत्यारांनी डोळे फोडण्यात आले असून, कपाळाच्यावर वार करण्यात आले आहेत. प्राप्त माहि तीनुसार, इसम कापसाचा व्यवसाय करीत होता; तसेच त्याची आर्थिक देवाण- घेवाणीचे व्यवहारसुद्धा असल्याचे समजते. याप्रकरणी आरोपीचा शोध घेण्याकरि ता बुलडाणा येथून श्वानपथक बोलाविण्यात आले होते. घटनास्थळाला डीवायएसपी रुपाली दरेकर, ठाणेदार साळुंके यांनी भेटी दिल्या. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कापूस व्यवसायीकाचा खून
By admin | Updated: November 20, 2014 23:17 IST