शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी दोन महिलांचा मृत्यू ; ४४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 10:39 IST

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २० झाली आहे.

ठळक मुद्देखामगाव येथील दोन महिलांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.गुरूवारी तब्बल ४४ जण कोरोना बाधीत आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असून गुरूवारीही तब्बल ४४ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. प्रयोग शाळेकडून प्राप्त २८० अहवालांपैकी २३६ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, खामगाव येथील दोन महिलांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २० झाली आहे. जिल्ह्यात सध्या ३५२ कोरोनाबाधीतांवर ुउपचार करण्यात येत असून एकूण रुग्ण संख्या ६६९ झाली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खामगाव १३, देऊळगाव राजा ११, जळगाव जामोद एक, शेगाव चार, बुलडाणा एक, नांदुरा दोन, वडगाव माळी सहा आणि मलकापूर पाच याप्रमाणे ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. देऊळगाव राजा येथे आढळून आलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा मुळचा जालना जिल्ह्यातील शिपोरा येथील आहे.खामगाव येथील ५० व ५५ वर्षीय महिलांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे गुरुवारी १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये साखरखेर्डा येथील दोन, देऊळगाव राजा तालुक्यातील सात जण, खामगावमधील जलालपुरा भागातील दोन, बुलडाण्यातील एका ३७ वर्षी महिलेचा समावेश आहे.दरम्यान, आजपर्यंत पाच हजार ५७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच २९७ कोरोना संक्रमीत लोकांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप जिल्ह्यात ४१ संदिग्ध रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा असून जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६६९ झाली आहे. सध्या ३५२ बाधीतांवर उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या