लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पृष्ठभूमीवर पुढील तीन दिवस जनता कर्फ्यू पाळल्या जात आहे. नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या प्रत्येक सूचनांचे पालन करून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन माजी कामगार मंत्री आ. डॉ.संजय कुटे व नगराध्यक्षा सीमाताई डोबे यांनी केले आहे. तर शहरातील सुमारे ६५० घरांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे.जो भाग कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. त्या भागात अन्य वस्तीतील नागरिकांनी जावू नये व त्या झोनमधील नागरिकांनी घराबाहेर सुद्धा पडू नये.तसेच आरोग्य विभागाच्या डॉक्टर व परिचारिकांना तपासणीकरिता पूर्ण सहकार्य करावे. कंटेनमेंट झोनमधील अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने तीन दिवस बंद ठेवावी. या भागातील बँक, पतसंस्था, दवाखाने हे सुद्धा तीन दिवस बंदच राहणार आहे. या झोनमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांना घरपोच देण्यात येणार असल्याचे डॉ. संजय कुटे म्हणाले.या बैठकीला नगराध्यक्ष सीमाताई डोबे, उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, ठाणेदार सुनील जाधव, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला पाटील उपस्थित होते.
CoronaVirus : जळगावात तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 11:59 IST