शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात सहा नवे रुग्ण; ३० जणांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 10:44 IST

जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असून शुक्रवारी पुन्हा सहा नव्या रुग्णांची यात भर पडली

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असून शुक्रवारी पुन्हा सहा नव्या रुग्णांची यात भर पडली आहे. शेलापूर येथील दोन, पलढग, बुलडाणा, मलकापूर आणि खामगाव येथील प्रत्येकी एकाचा यात समावेश आहे.परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा हा ८३ वर पोहोचला असून सध्या ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मोताळा तालुक्यात तीन नवे रुग्ण आढळून आले असून ते मुंबईवरून ते एका वाहनाद्वारे आले होते. दरम्यान या वाहनाच्या चालकाचा व त्यातील अन्य प्रवाशांचाही आरोग्य यंत्रणा सध्या शोध घेत आहे तर मोताळा तालुक्यातीलच पलढग येथी १९ वर्षाची युवती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. खामगावात पुरवार गल्लीमधील पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तीची पत्नीही पाच जून रोजी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. सुदैवाने हे दोघेही खामगाव आयसोलेशन कक्षात असल्याने पुढील धोका टळला आहे.बुलडाणा येथील महिला ही मुंबईवरून ३१ मे राजी आली होती. शंका म्हणून या महिलेने तिचा स्वॉब तपासणीसाठी दिला होता. तो पॉझिटिव्ह आल्यामुळे तिच्यासह कुटुंबातील चार जणांना आयसोलेशनमध्ये हलविण्यात आल आहे. मुंबईमधील विरार परिसरातील सरकारी रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत होती. मुळची बुलडाण्याची असल्याने ती परत आली होती. पलढग येथील युवती ही शेलापूर येथे आधी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे आता शेलापूर गाव परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ८२ झाली असून यापैकी ५० रुग्णांना सुटी देण्यात आली असून सध्या २९ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.१३ पैकी ११ तालुक्यात कोरोनाचा शिरकावबुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झला असून देऊळगाव राजात तीन, चिखलीमध्ये चार, सिंदखेड राजामध्ये सात, शेगावात पाच, जळगाव जामोदमध्ये दोन, मोताला तालुक्यात आठ, नांदुरा तालुक्यात पाच आणि संग्रामपूर तालुक्यात एक या प्रमाणे आतापर्यंत रुग्णांची नोंद झाली आहे. लोणार आणि मेहकर तालुक्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही मलकापूर, खामगावने आता चिंता वाढवली आहे.

बुलडाण्यातील महिलेने वाढवली चिंताबुलडाण्यातील कोरोना पॉझिटव्ह महिलेच्या कुटुंबियांना क्वारंटीन करण्यात आले आहे. ३३ वर्षीय ही महिला आई व दोन मुलींसह वावरे ले आऊटमध्ये राहते. तिच्या शेजारीच राहणाऱ्या दोन भावांच्या कुटुंबियांनाही क्वारंटीन करण्यात आले आहे. दरम्यान, या महिलेला बुलडाण्यात घेवून येण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. या व्यक्तीकडे अनेकांचे कपडे प्रेससाठी येतात. त्याचा संपर्कही दांडगा आहे. त्यातच या महिलेच्या घरी धुणीभांडी करणारी एक महिला ही असून तिचाही परिसरात अनेक घरी राबता होता. त्यामुळे आता बुलडाणेकरांची चिंता वाढवली आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा