शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ‘कोरोना’चा रूग्ण आढळल्याच्या  अफवेने खामगावात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:34 IST

‘कोरोना’चा कोणताही रूग्ण आढळला नसल्याचा खुलासा संबंधित रुग्णालयाने केला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:शहरातील एका नागरिकास ‘कोरोना’या आजाराची लागण झाल्याचा संदेश सोशल मिडीयावर सोमवारी सकाळी व्हायरल झाला. त्यामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, खात्री करण्यासाठी अनेकांनी संबंधित खासगी रूग्णालयात धाव घेतली. मात्र, ‘कोरोना’चा कोणताही रूग्ण आढळला नसल्याचा तसेच कोणत्याही रूग्णांवर उपचार सुरू नसल्याचा खुलासा संबंधित रुग्णालयाने केला. देशात कोरोनाचे ३४ संशयीत रुग्ण आढळून आल्यानंतर सर्वत्र सतर्कता बाळगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडूनही खबरदारी म्हणून सैलानी येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याचपार्श्वभूमीवर गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षीतता बाळगण्यात येत आहे. दरम्यान, अकोला येथे ‘कोरोना’ या आजाराचा संशयीत रूग्ण आढळून आला. त्यामुळे पश्चिम विदर्भात खळबळ माजली असतानाच, सोमवारी सकाळी खामगावात आणखी एक संशयीत रूग्ण आढळून आल्याचा एक संदेश सोशल मिडीयावर व्हायरल झाला. संशयीत रूग्णावर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याचेही संदेशात नमूद करण्यात आले. त्यामुळे खामगावात एकच खळबळ उडाली. मात्र, शेवटी खामगावात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याची केवळ अफवाच ठरली. तसेच संदेशात नमूद केले रुग्णाचे नावही फेक असल्याचे आढळून आले. खामगावात ‘कोरोना’चा रूग्ण आढळल्याची केवळ अफवा आहे. सोशल मिडीयावर नमूद नावाच्या कोणत्याही रूग्णावर आमच्या रूग्णालयात उपचार करण्यात आले नाहीत. तसेच कोणत्याही रुग्णाला नागपूर येथे हलविलेले नाही.

- डॉ. भगतसिंह राजपूत खामगाव.(प्रतिनिधी)

टॅग्स :corona virusकोरोनाkhamgaonखामगाव