शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील ८५ हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 11:25 IST

दहा कंटेन्मेंट झोनमधील ८५ हजार ५६९ नागरिकांपैकी ७९ हजार नागरिकांची आरोग्य विषयक तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या दृष्टीने राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी एक हॉटस्पॉट जिल्हा म्हणून समोर आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील तीन रुग्ण हे कोरोना संसर्गापासून मुक्त झाले आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यास एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सात तालुक्यातील दहा कंटेन्मेंट झोनमधील ८५ हजार ५६९ नागरिकांपैकी ७९ हजार नागरिकांची आरोग्य विषयक तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे.दरम्यान, बुलडाणा शहरातील पहिल्या तीन कोरोना बाधीत व्यक्ती कोरोनाच्या संसर्गातून मुक्त झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या आता १७ वर आली आहे. दरम्यान, १७ एप्रिल रोजी १९ व्यक्तींचे स्वॅब नमुन्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यास एकाच दिवशी दोन दिलासे मिळाले. अद्याप २१ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरा. जी. पुरी यांनी दिली.कोरोना आजारातून बरे झालेल्या तीनही रुग्णांना स्थानिक स्त्री रुग्णालयामध्ये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या हस्ते कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देत असल्याचे पत्र देण्यात आले आहे.दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील दहा क्लस्टर कंटेन्मेंट झोनमध्ये ३२६ पथकांद्वारे ८५ हजार ५६९ नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. १७ एप्रिल रोजी एकूण ७९ हजार ६९६ नागरिकांची तपासणी व सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करणाऱ्यांच्या मदतीसाठी ६४ डॉक्टरांचा समावेश असून पर्यवेक्षकांची संख्या ८२ आहे. या सर्व्हेक्षणादरम्यान पथकांना एकूण ३२ व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी दिली. सुदैवाने यापैकी कोणालाही श्वास घेण्यास त्रास होत नसल्याचेही जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आलेल्या अहवालात नमूद केले आहे.दरम्यान ८५ हजार नागरिकांमध्ये काही दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींचेही सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

१६ हजार घरांना भेटीआरोग्य पथकांनी १६ हजार १२६ घरांना १७ एप्रिल रोजी भेटी देऊन तेथील नागरिकांची वैद्यकीय दृष्ट्या माहिती संकलीत केली आहे. यामध्ये मलकापूरमधील९१५ बुलडाण्यातील जुन्या गावातील १५२०, मिर्झानगर परिसरातील ३,२३४, चिखलीतील ९१७, देऊळगाव राजातील १०२३ घरांना भेटी देऊन सर्व्हेक्षण केले.

३२ जणांना ताप, खोकलातपासणी करण्यात आलेल्या ७९ हजार नागरिकांमध्ये देऊळगाव राजात १२ आणि मलकापूरमधील १९ व्यक्तींमध्ये सदी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली आहे. चितोडा येथे एका व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसून आली. त्यामुळे शुक्रवारी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातही बुलडाणा जिल्ह्यास एक प्रकारे दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा