शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू; ३२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 11:01 IST

कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील दोन बाधीतांचा मृत्यू झाला असून खामगाव व चिखली येथील हे मृतक आहे

बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील दोन बाधीतांचा मृत्यू झाला असून खामगाव व चिखली येथील हे मृतक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या १७ वर पोहोचली आहे. दुसरीकडे ११ जुलै रोजी ३२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्येखामगाव प्रयोग शाळेत तपासणीनंतर १३ तर रॅपीड टेस्टमद्ये १९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी एकूण ४४३ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ४११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नांदुरा येथील चार, डोणगाव येथील एक, मलकापूर येथील तीन, मेहकर येथील दोन, खामगावमधील १३, मेहकर तालुक्यातील वडगाव माळी येथील पाच, संग्रामपूर तालुक्यातील सोनाला येथील एक, शेगाव येथील एक तर जानोरी येथील एका बाधीताचा समावेश आहे.दुसरीकडे उपचारादरम्यान खामगावमधील मस्तान चौकातील ६५ वर्षीय व्यक्ती आणि चिखलीतील रेणुका माता मंदिरा जवळ राहत असलेल्या ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हचा मृत्यूदर हा ३.८२ टक्क्यावर पोहोचला आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडामा जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे.दरम्यान आठ रुग्णांनी शनिवारी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये शेगाव तालुक्यातील आळसणा येथील पाच, जामठी (धाड) येथील एक आणि चिखली येथील एक व अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत चार हजार ३८१ रिपोर्ट निगेटीव्ह आले असून २३५ रुग्ण बरे झाले आहेत. अद्याप ८७ अहवालांची तपासणी बाकी आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या ४४५ झाली आहे. सध्या या पैकी १९३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या