शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : दहा स्थलांतरीत कोरोना ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 10:40 IST

पुणे, मुंबईस अकोला जिल्ह्यातून स्वगृही आलेल्या नागरिकांपैकी दहा जण कोरोना बाधीत निघाले आहेत.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लॉकडाउन तीन व चारदरम्यान मिळालेल्या शिथीलतेमुळे बुलडाणा जिल्ह्यात पुणे, मुंबईस अकोला जिल्ह्यातून स्वगृही आलेल्या नागरिकांपैकी दहा जण कोरोना बाधीत निघाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नियंत्रणात असलेला कोरोना संसर्ग आता अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात १६ मे पर्यंत पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह जवळपास राज्यातील २५ जिल्ह्यातून ७२ हजाराच्या आसपास नागरिक स्वगृही परतले होते. आता हा आकडा जवळपास लाखाच्या घरात गेला असून या स्थलांतरीतामधीलच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या आहेत. विशेष म्हणजे प्रारंभी बुलडाणा जिल्ह्यात चितोडा गावाचा अपवाद वगळता सर्वच कोरोना बाधीत रुग्ण हे शहरी भागात असल्याचे निदर्शनास येत होते. मात्र स्थलांतरीतांचा आकडा जसजसा वाढत आहे. तस तसा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचाही आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे हे स्थलांतर जिल्हा प्रशासन कोरोनाला नियंत्रीत करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना बहुतांशी मारक ठरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दरम्यन, त्यानंतरही महसूल प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे या कोरोना बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग करण्याचे कसब वाखाणण्या जोगे म्हणावे लागेल. गेल्या दोन महिन्याच्या अनुभवातून हायरिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्ट ओळखून आरोग्य विभागाकडून संदिग्धांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहे. त्यामुळे यात बहुतांशी अचुकता येत असल्याचे चित्र आहे.दहा जणांच्या संपर्कात आलेल्या तब्बल १९३ जणांना संदिग्ध रुग्ण म्हणून प्रशासनाने आरोग्य विभागाच्या स्वाधीन केले असून त्यांच्या चाचण्या घेण्यात येत असून निगेटीव्ह चाचण्या आलेल्याां मेडिकल प्रोटोकॉनुसार होम क्वारंटीनचा सल्ला देवून घरी सोडण्यात येत आहे. दरम्यान बाहेर गावाहून आलेल्यांमुळे जिल्ह्यात काहींना संक्रमण ही होत आहे. जळगाव जामोद येथील एकामुळे असेच संक्रमण झाले असून अद्याप जवळपास १०५ संदिग्ध रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांचे अहवाल जिल्हा प्रशासनास मिळालेले नाहीत. त्यानंतर प्रत्यक्षात एकंदरीत संक्रमणाची जिल्ह्यातील स्थिती स्पष्ट होईल.या उपरही प्रशासकीय पातळीव मे महिन्याच्या मध्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात समुह संक्रमणाचा मोठा धोका होऊ शकतो, असे संकेत यापूर्वी दिल्या गेले होते. मात्र प्रामुख्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, जिल्हा परिषद व आरोग्य विभागाची सर्व्हीलन्स पथके, पोलिस प्रशासनाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मिळणारे सहकार्य यामुळे बुलडाण्यातील स्थिती लगतच्या अकोला, बºहाणपूर, जळगाव खांदेश, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या तुलनेत बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.बाधीतांच्या संपर्काने एकूण १३ जण संक्रमीतबुलडाणा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात ३७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी आधीच्या कोरोना बाधीतांमुळे १३ जण संक्रमीत झाले असल्याच्या नोंदी प्रशासकीय पातळीवर आहे. बुलडाण्यात मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णापासून चार जणांना, सहाव्या व सातव्या बाधीतापासून, ११ व्या पासून दोन, १७ व्या रुग्णापासून तीन जणांना तर ३० व्या रुग्णापासून एकाला कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याच्या नोंदी आहेत. दरम्यान या ३७ जणांंच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील ५७१ व्यक्तींच्याही चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश जण निगेटिव्ह आले असले तरी अद्यापही १०५ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहे. दुसरीकडे रविवारी ३२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बुलडाण्यातील पहिल्या कोरोना बाधीताच्या संपर्कात तब्बल ८१ व्यक्ती आल्या होत्या. त्या सर्वांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात जिल्हा प्रशासनास यश आल्याने स्थिती नियंत्रणात राहली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा