शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Buldhana : पाच दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 10:20 IST

शनिवारी आणखी २० जणांचे व रविवारी नऊ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. शनिवारी आणखी २० जणांचे व रविवारी नऊ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण २९७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन दिवसांपूर्वी तीन कोरोना बाधीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने परिस्थितीत सुधारणा दिसत असली तरी प्रत्येकाने घरी थांबणे हाच उपाय आहे.कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत होते. खबरदारी म्हणून प्रशासनाने लॉकडाउनच्या नियमात वाढ करून त्याची कडक अंमलबाजवणी जिल्ह्यात सुरू केली आहे. १४ मार्च रोजी जिल्ह्यातील ५४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले होते. त्यामध्ये ५० निगेटीव्ह, व चार पॉझिटिव्ह अहवाल आले होते. पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये तीन मलकापूर, तर एक बुलडाणा येथील आहे. तसेच पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ६० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, ४२ व ५१ वर्षीय पुरूष आहेत. एकाच दिवसात चार पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पाच दिवसात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह तीन रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक असली तरी अजूनही नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सध्या दुचाकी व तीन चाकी वाहानांना बंदी घालण्यात आली आहे.

एकाच दिवसात नऊ अहवाल ‘निगेटिव्ह’रविवार, १९ एप्रिल रोजी प्राप्त नऊ पैकी नऊ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. शनिवारी सुद्धा २० अहवाल निगेटीव्ह आले होते. सध्या कोरोना बाधीत असलेल्या १७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरूवातीला कोरोना पॉझिटीव्ह आलेलया रुग्णाचा अंतीम तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यावरच त्या रुग्णाला कोरोना मुक्त म्हणून घोषीत केल्या जाते. आतापर्यंत जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची अंतीम तपासणी निगेटिव्ह आलेली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या