लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५४४ अहवाल ८ जानेवारी रोजी प्राप्त झाले आहेत. यापैकी ५२३ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून, २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, मेहकर तालुक्यातील कल्याण येथील ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे आठ जानेवारी रोजी मृत्यू झाला.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये देऊळगाव राजा येथील एक, पळसखेड चक्का एक, खामगाव सहा, हिवरा एक, सुटाळा खुर्द एक, मांडका एक, बुलडाणा एक, कोलारा एक, चंदनपूर एक, काठोडा एक, चिखली चार, लोणार एक, वसाडीमधील एकाचा यात समावेश आहे. मेहकर तालुक्यातील कल्याण येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांतील हा पाचवा मृत्यू आहे. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या १५७ झाली आहे.दुसरीकडे ३५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये देऊळगाव राजा कोविड केअर सेंटरमधील ११, जळगाव जामोद येथील दोन, लोणार एक, शेगाव नऊ, बुलडाणा सात, मोताला एक, सिंखेड राजा तीन आणि खामगावातील दोन जणांचा समावेश आहे.
CoronaVirus in Buldhana: एकाचा मृत्यू, २१ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 11:48 IST