शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी एकाचा मृत्यू;  १९ जण ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 12:56 IST

CoronaVirus in Buldhana: मेहकर तालुक्यातील एका ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३६९ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३५० जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून, १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, मेहकर तालुक्यातील एका ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४९ वर पोहोचली  आहे.शनिवारी बाधित आढळून आलेल्यांमध्ये खामगाव सात, देऊळगाव राजा पाच, चिखली एक, नांदुरा एक, सावंगी टेकाले एक, जळगाव जामोद एक, मलकापूर एक, बुलडाणा एक, दहीदमधील एकाचा यात समावेश आहे. यासोबतच उपचारादरम्यान मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दुसरीकडे शनिवारी ४१ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा कोविड केअर सेंटरमधून नऊ, शेगावमधून सात, देऊळगाव राजातून तीन, खामगावमधून नऊ, चिखलीमधून सहा, नांदुऱ्यातून दोन आणि मलकापूर कोविड केअर सेंटरमधील पाच जणांचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांची एकूण  संख्या १२,३५३ वर!आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ८६ हजार ५१६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तर ११ हजार ८९० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२,३५३ झाली असून, यापैकी  ३१४ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप ११८५ अहवालाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या