शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी ५२ पॉझिटिव्ह; ५० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 10:55 IST

जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन हजार २३१ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रविवारी बुलडाणा जिल्ह्यात ५२ जण कोरोना बाधीत आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन हजार २३१ झाली आहे. तर रविवारी तब्बल ५० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.प्रयोगशाळा व रॅपीड टेस्ट मिळून एकूण ३४२ जणांची रविवारी तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर २९० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. पॉझिटिव्ह अहवालामध्ये मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथे एक, मेहकरमध्ये चार, खामगावमध्ये सात, चिखलीमध्ये एक, शेळगाव आटोळ येथे एक, सोनेवाडी येथे चार, पिंपळगाव काळे येथे एक, माळेगाव एक, बोराखेडी एक, धामणगाव बढे येथे दोन, हतेडी एक, मोहोज एक, बुलडाणा तीन, शेगाव एक, जलंब एक, लोणार एक, मलकापूरमधील जाधववाडीमध्ये पाच, देऊळगाव राजात तीन, देऊळगाव राजातीलच उंबरखेड येथील एक, नांदुरा येथील चार, सिंदखेड राजातील हिवरखेड येथे तीन, पुण्यातील गोलोरेपार्क, बावधन येथील एक, अमरावती जिल्ह्यातील सिराजगाव येथील एक, अकोला येथील दोन जणांचा समावेश आहे.दुसरीकडे ५० रुग्णांनी रविवारी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा सहा, धाड सहा, शेगाव दोन, जळगाव जामोद एक, लोणार पाच, खळेगाव एक, बानापूर तीन, दहीफळ एक, सुलतानपूर एक, मेहकर चार, कळंबेश्वर एक, खामगावमधील १९ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १,३५३ कोरोनाबाधीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त १४ हजार १३२ संदिग्ध रुग्णांचेही अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. अद्यापही १६८ जणांच्या नमुन्यांची प्रतीक्षा आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार २३१ झाली असून सध्या एकूण रुग्णांपैकी अ‍ॅक्टीव असलेल्या ८३८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून मृतकांची संख्या ५० च्या टप्प्यात आली आहे.

स्वातंत्र्यदिनी झाला दोघांचा मृत्यूस्वातंत्र्य दिनी जिल्ह्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देऊळगाव मही येथील ५२ वर्षीय व्यक्ती व मलकापूर येथील ७१ वर्षीय व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातून कोरोना मृत्यूची संख्या ४० झाली आहे. स्वातंत्र्य दिनी ५३ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. दोन दिवसात जिल्ह्यात ८५ जण बाधीत आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या