शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Buldhana :  १७७ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 11:54 IST

गेल्या तीन दिवसापासून दररोज एका बाधीचा मृत्यू होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात सातत्याने वाढत असून शनिवारी तब्बल १७७ जण बाधीत आढळून आले तर शेगाव येथील एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसापासून दररोज एका बाधीचा मृत्यू होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपीड टेस्ट तपासणी केलेल्या ६४४ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी ४६७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर १७७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी १५५ तर रॅपीड टेस्टमध्ये २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. दुसरीकडे शेगाव येथे उपचारादरम्यान एका ७० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात झालेला हा तिसरा मृत्यू आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खामगाव ४४, देऊळगाव राजा २५ गारखेड दोन, बुलडाणा सहा, नागझरी एक, धाड एक, मातला एक, करवंड एक, चिखली सात, आमखेड चार, टाकरखेड दोन, बानखेड एक, दे. घुबे तीन सोनेवाडी एक, सावरगाव डुकरे एक, शेलदू एक, मलकापूर आठ, दाताळा तीन, घिर्णी एक, मेहकर तीन, डोणगाव एक, रायगाव एक, बिबी एक, शिवणी पिसा एक, चिंचोली एक, नांदुरा चार, निमगाव तीन, वडनेर एक, तारखेड एक, जळगांव जामोद एक, खेर्डा आठ, जांभोरा एक, साखरखेर्डा एक, हिवरा गडलिंग दोन, राहेरी नऊ, बारलिंगा एक, बोराखेडी दोन, धामणगाव एक, लोणार एक, जलंब एक, माटरगाव पाच, शेगाव दहा, जळका तेली एक, पिंपळगाव राजा दोन, वर्णा एक, शेलोडी एक, सिंदखेड राजा एक, आणि अकोला येथील गौरक्षण वाडीमधील एकाचा यामध्ये समावेश आहे.

१७५ रुग्णांची कोरोनावर मातशनिवारी १७५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. यामध्ये मेंडगाव एक, सरंबा एक, शेगाव २४, नांदुरा सहा, खामगाव सात, चिखली ११, शेलूद एक, मलकापूर पांग्रा एक, दरेगाव ४, तांदुळवाडी दोन, आगेफळ एक, मोहाडी सवडत चार, बुलडाणा २५, वरवंड एक, जीगाव एक, नायगाव चार, धानोरा एक, मेहकर तीन, लाखनवाडा १२, माटरगाव एक, जानेफळ आठ, डोणगाव १७, जामगाव तीन, जळगाव जामोद सात, वाडीखुर्द तीन, देऊळगाव राजा २३, शिरढोण एक, लोणवडी एक, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान, आतापयंत २२, ७७१ संदिग्ध व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहे तर बाधीत रुग्णांपैकी ३,५३५ कोरोना बाधीत रुग्ण बरे झाले आहेत. अद्यापही १,४६८ संदिग्दांच्या अहवालाची प्रतीक्षा ्सून जिल्ह्यातील कोराना बाधीतांचा आकडा ४,७७४ वर पोहोचला आहे. सध्या रुग्णालयात १,१७६ व्यक्ती उपचार घेत असून ६३ कोरोना बाधीतांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या