शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : एकाच दिवशी १०४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २,३५६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 19:27 IST

जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी तब्बल १०४ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी तब्बल १०४ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या ही २,३५६ झाली आहे. पैकी आतापर्यंत १,४४९ जणांनी कोरोनावर मात केल्याचे एक सुखद चित्र असून वर्तमान स्थितीत ८६७ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले व रॅपीड टेस्टमधील मिळून एकूण २५९ जणांचे अहवाल १८ आॅगस्ट रोजी आले होते. त्यापैकी १०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून १५५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा येथील कोवीड केअर सेंटरमधील १३ महिला, २७ पुरुष असे एकूण ४० तर आयुर्वेद महाविद्यालयाच्या कोवीड केअर सेंटरमधील सहा पुरुष, तीन महिला पॉझिटिव्ह आल्या. मेहकर कोवीड सेंटरमधील चार पुरुष, सात महिला असे एकूण ११ जण, नांदुरा सेंटरमधील सात पुरुष, मलकापूर सेंटरमधील दोन महिला, तीन पुरुष असे एकूण पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. खामगाव कोवीड सेंटरमधील दहा महिला, १५ पुरुष असे एकूण २५ जण तर सिंदखेड राजा कोवीड सेंटरमधील तीन, शेगावमधील दोन, देऊळगाव राजामधील दोन या प्रमाणे १०४ या सेंटर अंतर्गत पॉझिटिव्हआले आहेत.दुसरीकडे ५० रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा येथून दहा महिला व सहा पुरुष असे एकूण १६, देऊळगाव राजा कोवीड सेंटरमधील चार महिला, जळगाव जामोद सेंटरमधील तीन, खामगाव सेंटरमधील नऊ, लोणारमधील सहा, मेहकरमधील एक, नांदुऱ्यामधील एक, शेगावमधील सहा आणि खामगाव शासकीय सामान्य रुग्णालयातील कोवीड सेंटरमधून तीन तर बुलडाणा येथील महिला रुग्णालयातून एका जणाचा समावेश आहे. हे ५० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांपैकी आतापर्यंत १४ हजार ३७१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

१,४४९ जणांना रुग्णालयातून सुटीआतापर्यंत १,४४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दुसरीकडे अद्यापही १२३ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल प्रतीक्षेत असून वर्तमान स्थितीत जिल्ह्यात एकूण २,३५७ रुग्ण संख्या असून त्यापैकी १,४४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या ८६७ बाधीत रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत तर ४० जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा