शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा कोरोनामुक्त; कामठी येथील तिघांना रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:29 IST

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील तिघांना दहा एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बुलडाणा येथील कोरोना सुश्रूषा केंद्रातून सुटी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या ४० दिवसापासून कोरोना संसर्गाच्या ससेमिऱ्यात अडकलेला बुलडाणा जिल्हा आज एक प्रकारे कोरोना मुक्त झाला असून नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील तिघांना दहा एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बुलडाणा येथील कोरोना सुश्रूषा केंद्रातून सुटी देण्यात आली.त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात आता एकही कारोना बाधीत रुग्ण राहलेला नाही. परिणामी आता बुलडाणा जिल्ह्याची ग्रीनझोनकडे वाटचाल सुरू झाली आहे.आगामी २८ दिवस एकही कारोना बाधीत रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात आढळून न आल्यास बुलडाणा जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाऊ शकतो. त्यादृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर अधिक सतर्कता राखण्यात येत आहे.पश्चिम वºहाडात कोरोना संसर्गामुळे बुलडाणा जिल्ह्यात पहिला बळी गेला होता. त्यामुळे केद्र शासनासमोबतच राज्य शासनाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा एक संवेदनशील जिल्हा म्हणून समोर आला होता. त्यानंतर सातत्याने बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडत गेले ही सख्या २४ वर पोहोचली होती. बुलडाणा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी शेवटचे पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले होते. धर्मप्रचारक म्हणून बुलडाणा जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यातीली कामठी येथून आलेल्या ११ पैकी तीन जण कोरोना पाझीटीव्ह आल्यामुळे बुलडाण्याची ग्रीन झोनकडे असलेली वाटचाल अचानक आॅरेंज झोनमध्ये परावर्तीत झाली होती. अखेर दहा एप्रिल रोजी या तीनही जणांचे सलग दोन रिपोर्ट १३ व्या दिवशी निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात सध्या एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण नाही. त्यामुळे ४० दिवसानंतर आरोग्य यंत्रणेने काही काळ का होईना सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागासह सर्व्हेक्षणासाठी (अ‍ॅक्टीव्ह सर्व्हीलन्स) जवळपास १२०० कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांचे हे यश आहे, असे म्हणावे लागले. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण नसला तरी नागरिकांनी गाफील राहू नये.

आतापर्यंत ७४८ जणांच्या तपासण्याआतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील ७४८ संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी ६१५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.२४ जण पॉझीटीव्ह आढळून आले होते. यापैकी एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. दरम्यान, सापडलेले उर्वरित २३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ स्वॅब नमुन्याचे अहवाल अकोला प्रयोग शाळेत प्रलंबी आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील ११ प्रतिबंधीत क्षेत्राताली ९२ हजार ५४६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या