शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाण्यात एकाच दिवशी ८० पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या १३४८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 11:08 IST

वर्तमान स्थितीत ४८८ बाधीतांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शनिवारी जिल्ह्यात संदिग्ध रुग्णांच्या तपासणीदरम्यान ८० जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या १३४८ वर पोहोचली असून वर्तमान स्थितीत ४८८ बाधीतांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.गेल्या २४ तासात एकूण ३८७ अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ३०७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालापैकी ७२ ्हवाल हे प्रयोगशाळेतील तपासणीदरम्यान तर आठ जणांचे अहवाल हे रॅपीड टेस्टमद्ये पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह अहवालामध्ये मेहकरमध्ये सात, लोणी गवळी येथे ११, घाटबोरी येथे तीन, नांदुरा येथे पाच, चिखलीमधील सवणा येथे १३, धाडमध्ये सहा, बुलडाण्यात दोन, देऊळगाव मही येथे दोन, खामगावमध्ये २३, शेगाव तालुक्यातील माटरगावमध्ये एक, देऊळगाव राजामध्ये पाच, बावनबीरमध्ये एक महिला पॉझिटिव्ह आली आहे. या प्रमाणे एकूण ८० जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.दुसरीकडे शनिवारी ४२ जणांनी कोरोनावर मात केली त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये देऊळगाव राजा येथील सहा शेगावातील दहा, नांदुरा येथील एक, जळगाव जामोदमधील सहा, बुलडाणा येथील चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. मलकापूरमधील एक व्यक्तीही कोरोनामुक्त झाला आहे तर चिखलीमधील दोन पुरुष व एक महिला तर खामगावमधील दोन महिला आणि सात पुरुषांना कोरोना मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या नऊ हजार २२२ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आजपर्यंत जिल्हयातील ८३० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ११८ अहवाल अद्याप बाकी आहेत.

६२ टक्के रुग्ण कोरोना मुक्तजिल्ह्यात कोरोनाबाधीत आढळून आलेल्या १३४८ रुग्णांपैकी ६२ टक्के रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. ८३० च्या आसपास या रुग्णांची संख्या आहे. दुसरीकडे अद्यापही ११८ संदिग्ध रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्याचा कोरोना बाधीतांचा मृत्यूदर हा वर्तमान स्थिीत २.२२ टक्के असून आजपर्यंत जिल्ह्यात ३० कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा