शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यातील १,६३४ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 13:09 IST

आतापर्यंत १ हजार ६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता अडीच हजारावर पोहचली आहे. त्यामध्ये बरे होण्याचे प्रमाणही दिलासादायक आहे. आतापर्यंत १ हजार ६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील कोरोनामूक्त झालेल्या एकाही रुग्णाला पुन्हा कोरोनाची बाधा झाली नाही. कोरोना विषाणूच्या संक्रमणातून बाहेर आल्यानंतर रुग्णांच्या शरीरात एंटीबॉडीज तयार होतात, त्यामुळे बरे झालेल्यांना पुन्हा संक्रमण होण्याची भीती तशी फार कमी आहे.जिल्ह्यात गत महिन्याभरपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या २ हजार ५५७ वर पोहचली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी त्यावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही हजारोंच्या घरात पोहचले आहे. काही ठिकाणी करोनावर मात केल्यानंतरही अनेकांना बाधा होत असल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण कोरोनातून बरा झाल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह आला नाही. कोरोनामूक्त झालेल्या अशा रुग्णांपासून संसर्ग फैलावण्याचा धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर १० दिवसासाठी त्या रुग्णाला कोव्हीड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. त्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अनुषंगाने त्याला खाणे पिणे, व उपचार केले जातात. १० दिवसानंतर कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६३४ रुग्ण कोरोनामूक्त झाले आहेत. त्यांना वैद्यकीय प्रोटोकालप्रमाणे सुटी देण्यात आली. बरे झालेले रुग्ण घरी गेल्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह आले नसल्याने रुग्णांसाठी ही दिलासादायक बाब आहे. या व्यक्तींच्या शरीरात प्रतिरक्षक द्रव्य (अँटीबॉडीज) तयार होताता, त्यामुळे या बरे झालेल्यांना पुन्हा संक्रमणाचा धोका कमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.कोरोनामूक्त झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह येण्याचा प्रकार जिल्ह्यात आतापर्यंत कुठेच दिसून आला नाही. उपचारानंतर रुग्ण कोरोनाविरुद्ध लढण्यास सक्षम होतात. दहा दिवसांच्या उपचारामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष दिल्या जाते.-प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या