शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : बुलडाणा जिल्ह्यात ६१ हजार नागरिकांचे लसीकरण पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 11:22 IST

Corona Vaccination २३ मार्चपर्यंत जिल्ह्यात ६१ हजार ८५० नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेने आता वेग घेतला असता २३ मार्चपर्यंत जिल्ह्यात ६१ हजार ८५० नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला होता. प्रारंभी आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, दुर्धर आजार असणारे आणि ज्येष्ठ नागरिकांना या क्रमाने लसीकरण करण्यात येत  आहे. आता ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस देण्यास प्रारंभ झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यात ७२ शासकीय केंद्र आणि १६ खासगी रुग्णालयामध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रारंभी मोजक्याच चार केंद्रावर लसीकरण करण्यात येत होते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने याची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता पुन्हा तिसऱ्या टप्प्यात मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.आतापर्यंत ६१ हजार ८५० जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ६,२१७ दुर्धर आजार असणारे आणि ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या २६ हार ९२५ नागरिकांना लस देण्यात आली आहे.  हा लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

रविवारीही होणार लसीकरणयापूर्वी रविवारी जिल्ह्यात लसीकरण होत नव्हते. आता रविवारीही लसीकरण करण्यात येणार असल्याचे संकेत आरोग्य विभागातील सूत्रांनी दिले. त्यानुषंगाने सध्या नियोजन सुरू आहे. २२ मार्च रोजी यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आरोग्य विभागाने घेतली असून प्रसंगी या रविवारपासूनच यास प्रारंभ होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसbuldhanaबुलडाणा