शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 12:00 IST

Corona vaccine  एका दिवशी ५,२०० व्यक्तींना लस देता येईल, एवढी क्षमता आरोग्य विभागाची आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे नोंदणी झालेली आहे.आरोग्य विभागातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानुषंगानेच पूर्वतयारी म्हणून ८ जानेवारी रोजीची रंगीत तालीम करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने २ अंश सेल्सिअस ते ८ अंश सेल्सिअस तापमानादरम्यान साठवाव लागणारी लस उपलब्ध होईल, असे संकेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिले. बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार असून, आतापर्यंत १३ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे नोंदणी झालेली आहे.  सोबतच लस साठवणुकीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. शीतकरण साखळीतील सर्व उपकरणांची चाचपणीही झाली असल्याचे ते म्हणाले.दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात एका दिवशी ५,२०० व्यक्तींना लस देता येईल, एवढी क्षमता आरोग्य विभागाची आहे; मात्र कोरोना संसर्ग व धोके पाहता गुणात्मक पद्धतीने आजवरची सर्वात मोठी ही लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे केवळ उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने हे अभियान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  प्रसंगी येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यताही सध्या आरोग्य विभागाच्या वतुर्ळात सुरू आहे; परंतु अधिकृत स्तरावर त्याबाबत कोणी बोलण्यास तयार नाही.

लसीकरणानंतर ३० मिनिटेच निरीक्षण का?लसीकरणानंतर लाभार्थ्याला तेथेच ३० मिनिटे निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. कोरोना लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नसल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले; मात्र अनेकदा मानसिक स्तरावर अस्वस्थता असल्याने काहींना रिॲक्शन येण्याची शक्यता असते. तर काहींना ॲलर्जीची शक्यता असते. या स‌र्व बाबी साधारणत: ३० मिनिटांमध्ये घडू शकतात. त्यानुषंगाने लसीकरणानंतर ३० मिनिटे डॉक्टरांच्या निरीक्षणात लाभार्थ्यांना ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तेथे लाभार्थ्यांचे समुपदेशनही करण्यात येऊन व्यसनमुक्तीसह अन्य आरोग्यविषयक माहिती देऊन त्यांची जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामुळे या लसीकरणासंदर्भात कोणी शंका बाळगू नये, असेही आरोग्य विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या