शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : शहरी भागातील नागरिकांची लसीकरणासाठी खेड्याकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 10:48 IST

Corona Vaccination : गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकर मिळेल, हा मुद्दा हेरत शहरातील अनेकांनी ‘चलो गाव की अैार’चा नारा देत लसीचा लाभ घेण्याचा सपाटा सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव/नरवेल : ग्रामीण भागाच्या विविध गरजा शहरी भागावरच अवलंबून असल्याने त्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची दैनंदिन शहराकडे धाव असते, त्याचवेळी गावातील लोकांनी आँनलाइन नोंदणी न केल्याने कोरोना प्रतिबंधक लस गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकर मिळेल, हा मुद्दा हेरत शहरातील अनेकांनी ‘चलो गाव की अैार’चा नारा देत लसीचा लाभ घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. खामगाव तालुक्यातील जलंब, मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे हे प्रकार उघडकीस आले आहेत.ही लस घेण्यासाठी फक्त ऑनलाईन नोंदणी करणारेच हजर असतात. नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी शनिवारी नांदुरा , मलकापूर, मुक्ताईनगर जळगाव खान्देश तसेच इतर शहरातूनही नागरिक आल्यामुळे स्थानिकांचा लोकांचा रोष वाढला. ते पाहता  दसरखेड एमआयडीसी पोलिसांना पाचारण करण्यात आले. नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अकरा उपकेंद्र आहेत. त्यामध्ये ४३ गावे आहेत. त्या गावातील नागरिकांना लस मिळणे आवश्यक आहे.  मात्र, शासनाने ऑनलाइन नोंदणी करून कुठेही लस घेऊ शकता, असे जाहीर केले. त्यामुळे नरवेल येथे बाहेरगावाच्या नागरिकांचा भरणा अधिक दिसून आला. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील लोकांनी कुठे जावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी न करता फक्त स्पाँट रजिस्ट्रेशन करून घेण्याच्या सूचना शासनाने द्याव्या, अशी मागणी पुढे आली. 

ऑनलाईन नोंदणी करून कोणी कुठेही लस घेऊ शकतो, असे शासनाने म्ह्टले आहे.  सध्यातरी स्पाँट रजिस्ट्रेशन करण्याच्या कुठल्याच सूचना आतापर्यंत मिळालेल्या नाहीत. परंतु थोड्या जास्त प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर सोमवार ,मंगळवार पर्यंत स्पाँट रजिस्ट्रेशन करुन स्थानिक लोकांना प्राधान्य देणार आहोत. - डॉ. रवींद्र गोफने, लसीकरण मोहिम अधिकारी, जि. प. बुलडाणा.

नोंदणीएवढे लसीकरण नाही   शनिवारी या केंद्रात नोंदणी केलेल्या १०० पैकी ९१ व्यक्तीच लसीकरणासाठी आल्या. उर्वरित नऊ लसी इतरांना देता येत नाहीत. त्यामुळे स्पाँट रजिस्ट्रेशनचा पर्याय देऊन लसीकरण करावे, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkhamgaonखामगावbuldhanaबुलडाणा