शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरण व मद्यपानाचा संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:33 IST

बुलडाणा : कोरोना लसीकरणासाठी काही प्रमाणात असलेल्या अनास्थेसाठी मद्यपान व खानपान याबाबत नागरिकांमध्ये शंका आहेत. लसीकरण व मद्यपान याबाबत ...

बुलडाणा : कोरोना लसीकरणासाठी काही प्रमाणात असलेल्या अनास्थेसाठी मद्यपान व खानपान याबाबत नागरिकांमध्ये शंका आहेत. लसीकरण व मद्यपान याबाबत मार्गदर्शक सूचना नसल्या तरी मद्यपानामुळे प्रतिकार क्षमता कमी होत असल्याने शक्यतोवर मद्यपान टाळावे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. त्यामुळे काही सामान्य प्रश्न अनेकांच्या मनात गोंधळ घालत आहेत. याबाबत डॉक्टरांना थेट विचारणाही होत आहे. लस घेतल्यानंतर किती दिवसानंतर मद्यपान करावे, आहारात काय घ्यावे व काय घेऊ नये, लसीकरणानंतर रक्तदान किती दिवसात करावे, यासारखे प्रश्न थेट विचारले जात आहे. लस घेतल्यानंतर मद्यपान करावे किंवा करू नये, असा कुठेच अभ्यास नाही, किंवा तसा काही संबंधही नाही. मात्र, मद्यपान टाळावे यामुळे प्रतिकारक्षमता कमी होते. मांसाहाराच्या बाबतीतही तसा अभ्यास नाही. मात्र, लसीकरण केल्यानंतर मांसाहार करू नये, हा गैरसमज असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

..........प्रतिक्रिया......

लसीकरण व मद्यपान याबाबत मार्गदर्शक सूचना आल्या नाहीत. मात्र लसीकरणानंतर सुरुवातीचे तीन दिवस मद्य टाळावे. कारण परिणाम लसीचा आहे की, मद्याचा यात गैरसमज होऊ शकतो. अतिमद्यप्राशन घातक असून यामुळे रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.

-डॉ. नीलेश टापरे, निवासी वैद्यकीय अधीक्षक़

...........चौकट.........

रशियात लसीकरणानंतर मद्यपानाला निर्बंध

रशियात लोकांना लस घेतल्यानंतर ४५ दिवस मद्यपान करू नये, असा सल्ला देण्यात आला होता. कारण यामुळे ॲन्टिबॉडी तयार होण्यास अडचण निर्माण होते. मात्र, भारतात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. या लस घेतल्यानंतर साधारणत: तीन आठवड्यांमध्ये ॲन्टिबॉडी तयार होतात. मद्यपान व लसीकरणाचा प्रभाव कमी होण्याबाबत कुठेही ठोस निष्कर्ष नाहीत. मात्र, अतिमद्यप्राशन केल्याने रोग प्रतिकारक क्षमता कमी होते.

...................................