शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आठ महिन्यांत ४ टक्के नागरिकांच्या कोरोना चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:12 IST

CoronaVirus News बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट (प्रोग्रेसिव्ह) सध्या १२ टक्क्यांवर आला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यातील ४ टक्के नागरिकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून, त्यापैकी १२ हजार  १३६ संदिग्ध कोराेना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट (प्रोग्रेसिव्ह) सध्या १२ टक्क्यांवर आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या घटनेला येत्या २८ डिसेंबरला आठ महिने पूर्ण होतील. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकंदर कोरोना चाचण्यांची माहिती घेतली असता हीबाब समोर आली आहे. विशेष म्हणजे बुलडाण्यात सापडलेल्या पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडात बुलडाणा जिल्हा चर्चेत आला होता, तर घटनेचे गांभीर्य पाहता आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी यांनी तातडीने बुलडाणा जिल्ह्यास भेट देऊन आरोग्य यंत्रणेला सतर्क करत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात जि्ल्ह्यात कोराेनाची लाट आली होती. ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमणाचा वेग वाढला होता. त्यानंतर दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत होती. याच कालावधीत नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात  १,८३१ कोरोनाबाधित आढळून आले होते. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात १२ हजार १३६ कोरोनाबाधित असून, १४६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.  ३५३ ॲक्टीव्ह रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लसीकरण प्रशिक्षण पूर्णजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गतच्या १६ संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरणासंदर्भातील प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठस्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भातील एक व्हीसीही संपलेल्या आठवड्याच्या प्रारंभी घेण्यात आली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. 

दैनंदिन बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमीदररोज करण्यात येणाऱ्या तपासण्यांमध्ये बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. रविवारी प्राप्त झालेल्या ९५९ अहवालांपैकी ४९ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्याचे प्रमाण पाहता दैनंदिन स्तरावर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण अवघे ५.१० टक्क्यांवर आले आहे. जे की डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी सहा टक्के होते. एक टक्क्याने त्यात घट झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या