शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील झोपडपट्टी परिसरातून कोरोना हद्दपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 18:02 IST

Khamgaon News रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने खामगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कधी काळी कोरोनासाठी हाॅटस्पाॅट केंद्र ठरलेल्या खामगाव शहरातील अनेक मागासवस्त्यांतून कोरोना हद्दपार झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. गतकाही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने खामगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. खामगाव शहरातील विविध मागास वस्त्यांमध्ये एकुण ४६५ कोरोनाचे संक्रमित रूग्ण आढळून आले होते. यामध्ये बहुतांश रूग्ण बरे झाले असून ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू संक्रमनाने देशात धुमाकूळ घातला असतानाच, सुरूवातीला बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या बोटावर मोजण्या इतकी होती. जिल्हा कोरोना मुक्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पासूनच मोठ्याप्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून आले. यामध्ये मलकापूर आणि खामगाव ही दोन तालुके कोरोनासाठी  हाॅटस्पाॅट ठरले होते. खामगाव शहरातील कोरोना ग्रस्तांची रूग्णसंख्या१२६४  आहे. यामध्ये झोपडपट्टी भागातील रूग्णांची संख्या ४६५ इतकी आहे. खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ६७० रूग्ण आढळून आले होते. खामगाव तालुक्यातील पहीला रूग्ण चितोडा येथे  आढळून आला होता. त्यानंतर जळका भंडग येथे एकाच कुटुंबातील आठ जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले होते. कधीकाळी कोरोनाचे हाॅटस्पाॅट केंद्र ठरलेल्या खामगाव शहरातील रूग्ण संख्येत आता झपाट्याने घट होत आहे. खामगावातील मागासवस्तीमधून कोरोना आता कोरोना जवळपास हद्दपार झाला आहे. त्यामुळे कोरोनाबद्दलची भीतीही संपुष्टात येत असल्याचे चित्र खामगाव आणि परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यात कोरोना चाचण्याही थंडावल्या आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाचा शहराला फटका बसला होता. मागासवस्त्यांमध्ये कोरोनाचा धुमाकुळ होता. दरम्यान, आता कोरोनाच्या रूग्णसंख्येत समाधानकारक घट होत आहे. मागास वस्तीमध्येही कोरोना रूग्णांचे प्रमाण अत्यल्प आहेे        - डॉ. निलेश टापरेनिवासी वैद्यकीय अधिकारी , खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या