शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona in Buldhana : पॉझिटिव्हिटी रेट नियंत्रणाचे प्रशासनासमाेर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 10:50 IST

Corona in Buldhana: १५.११ टक्के असलेला सरासरी रेट १० टक्क्यांच्या खाली आणण्याचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राज्यातील कोरोना संक्रमण अधिक असलेल्या १४ जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात निर्बंधांमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यासाठी जिल्ह्याचा सध्या १५.११ टक्के असलेला सरासरी रेट १० टक्क्यांच्या खाली आणण्याचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. त्यातच वरिष्ठ स्तरावरील निर्देशानुसार बुलडाणा जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही गंभीरतेने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, बाधित व्यक्तीच्या अतिनिकट व निकट संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्यांवरही आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विखुरलेल्या पद्धतीने कोरोनाच्या चाचण्या न करता बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झालेले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात प्रतिदिन किमान दहा हजार व्यक्तींच्या चाचण्या करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असले तरी वर्तमान स्थितीत सरासरी सहा हजार व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामध्ये आणखी दोन हजारांची वाढ करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या पाहता १४ लाख व्यक्तींचे ट्रेसिंग करण्यात सध्या यंत्रणा व्यस्त असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या आठ दिवसांतील पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला आहे. २५ मे रोजी तो  तो ९.०८ आहे. त्यामुळे जिल्ह्याची स्थिती सुधारत असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती म्हणाले.त्यामुळे १ जूननंतर जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता मिळेल का, याबाबत विचारणा केली असता टप्प्याटप्प्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार त्यात शिथिलता मिळले. मात्र, त्यासाठी शारीरिक अंतर पाळणे, मास्क घालणे आणि नियमित हात धुणे या त्रिसूत्रीचे जनसामान्यांनी  पालन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 

दोन्ही टास्क फोर्सचे गठणम्युकरमायकोसिस आजाराच्या संदर्भाने उपाययोजना व उपचार करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय टास्क फोर्स गठित करण्यात आला असून, कोरोनाबाधित लहान मुलांवर नेमके कोणते व कसे उपचार करावेत, याबाबतचाही जिल्हास्तरीय टास्क फोर्स गठित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कोरोना व्हायरसच्या नवीन म्युटेशनचा लहान मुलांना धोका असण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व बालरोग चिकित्सकांची एक कार्यशाळाच प्रशासन घेणार असल्याचे ते म्हणाले.

पायाभूत सुविधांवर भरसंभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य देण्यात आले. व्हेंटिलेटर्स, सीसीसी, कोविड हाॅस्पिटल व ग्रामीण भागात विलगीकरण कक्षही उभारण्यात आले आहेत. यासोबतच चार खासगी कोविड रुग्णालयांसह शासकीय ७ रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांट निर्मितीचेही काम वेगाने सुरू आहे. वर्तमान स्थितीत यापैकी पाच ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झालेले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या