बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी १,२१३ अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, १,१६८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी १३ जणांनी कोरोनावर मात केली.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा शहरातील ११, देऊळगाव राजा व चिखली शहरातील प्रत्येकी तीन, अंचरवाडी येथील एक, केळवद येथील सहा, अमोना एक, शेलूद एक, अंत्री खेडेकर एक, खामगाव सहा, सिंदखेड मातला एक, येरळी एक, मलकापूर पाच, शेगाव चार, सारोळा मारोती एक, तळणी एक, अंबोडा एक, पिंपळगाव राजा दोन, पळशी एक, टेंभुर्णा एक, बोथाकाजी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
याचवेळी १३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रविवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा येथील कोविड सेंटर व स्त्री रुग्णालयातून सहा, लोणारमधून चार, चिखली एक, सिंदखेड राजा येथील दोघांना घरी सोडण्यात आले आहे.
१२५३ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
जिल्ह्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या अहवालांपैकी १ लाख ९ हजार २८० संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत बाधितांपैकी १३ हजार ४१८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १,२५३ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात रविवारअखेर १३ हजार ९७३ कोरोेनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी प्रत्यक्षात ३८६ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.