शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

अपंगांच्या शाळांवर आता सीईओंचे नियंत्रण

By admin | Updated: September 28, 2015 02:33 IST

१८ शाळांच्या अडचणी दूर होणार; लवकरच गठित होणार जिल्हास्तरीय समिती.

बुलडाणा : अनुदानापासून तर भौतिक सुविधांसारख्या अशा अनेक समस्यांना अपंग शाळांना सामोरे जावे लागते. या अडचणी कुणाकडे मांडाव्या, असा प्रश्न या शाळांपुढे होता. त्यासाठी आता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचे आदेश २४ सप्टेंबर रोजी शासनाने दिले असून, लवकरच प्रत्येक जिल्ह्यात ही समिती गठित होणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात अपंगांच्या जवळपास १८ शाळा आहेत. या सर्व शाळा अनुदानित आहेत. याव्यतिरिक्त काही शाळा विनाअनुदान तत्त्वावर सुरू आहेत. या विनाअनुदानित शाळावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शाळांपेक्षा अपंगांच्या विशेष शाळांकडे पाहण्याचा समाजाचा आणि प्रशासनाचाही दृष्टिकोन फारसा चांगला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शासकीय निकषाप्रमाणे पुरेशा सोयी-सुविधा मिळतात किंवा नाही, याबाबत फारशी जागरूकता नाही. राज्यभरात सध्या जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली या शाळांचा कारभार सुरू आहे; परंतु बरेचवेळा समाजकल्याण स्तरावर अपंग शाळांच्या प्रश्नाची तड लागत नसल्याची ओरड सुरू होती. त्यांच्या सातत्याने समस्या प्रलंबित राहात होत्या. या समस्यांना आता तत्काळ तडीस नेता यावे म्हणून जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील. अपंगांसाठी भरीव कामगिरी करणार्‍या जिल्ह्यातील चार व्यक्तींची या समितीवर नियुक्ती केली जाणार आहेत तसेच प्रत्येक प्रवर्गातील अपंग विद्यार्थ्यांचे पालक, अपंग शाळांचे अध्यक्ष किंवा सचिव यांचाही समावेश राहणार आहे. बहुतांश अपंग विद्यार्थ्यांचे पालक गरीब घटकातील आहेत. त्यांना हा खर्च पेलवत नाही. परिणामी, अनेकांना शिक्षण सोडून किरकोळ व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन उदरनिर्वाहाचा मार्ग शोधावा लागतो.